केंद्र सरकारने नुकत्याच सुरू झालेल्या अग्निपथ योजनेवरून संपूर्ण देशात गोंधळ उडाला आहे. या योजनेच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये तरूण रस्त्यावर उतरले आहेत. अग्निपथ योजनेबाबत विरोधकही केंद्र सरकारवर सातत्याने हल्ला चढवत आहेत. यातच, झारखंडकाँग्रेसच्या एका आमदाराने अग्निपथ भरती कार्यक्रम मागे न घेतल्यास देशभरात रक्तपात होईल, अशी धमकी दिली आहे.
काय म्हणाले, काँग्रेस आमदार? -काँग्रेस आमदार इरफान अंसारी म्हणाले, सरकारच्या या निर्णयामुळे संपूर्ण देशात हिंसाचार पसरेल. भलेही देश रक्ताने माखला तरी, आम्ही हा नवा सैन्य भरती कार्यक्रम सुरू होऊ देणार नाही. अग्निपथ योजनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना अंसारी म्हणाले, गेल्या आठ वर्षांत सरकारने कुठल्याही प्रकारचा रोजगार दिला नाही. पंतप्रधानांनी गेल्या आठ वर्षांत कुठल्याही नोकऱ्या दिल्या नाही. मात्र, आज आपण देशाचे सैन्य विकत आहात. आज देशातील तरूण संतप्त आहेत, ते रस्त्यावर आंदोलन करत आहेत. यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीत अग्निपथ योजना लागू होऊ देणार नाही.
अग्निपथ योजना 'दिशाहीन' -अग्निपथ योजनेचा विरोध तीव्र झाल्यानंतर, काँग्रेसने शनिवारी एका निवेदनात भर्ती कार्यक्रम दिशाहीन असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर भू दल, नौदल आणि हवाई दलात अनेक जागा रिक्त असतानाही गेल्या तीन वर्षांत कुठल्याही प्रकारची भरती झालेली नाही. आम्हाला खेद आहे, की आपल्या आवाजाकडे केंद्र सरकारने दूर्लक्ष केले आणि नवी भरती योजना आपल्यावर थोपली. जी पूर्णपणे दिशाहीन आहे. एवढेच नाही, तर अग्निपथ योजनेवर लष्करातील अनेक दिग्गज मंडळींनी आणि संरक्षण तज्ज्ञांनीही प्रश्न उपस्थित केले आहे, असेही काँग्रेसने म्हटले आहे.