शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

भाजपा खासदारानं कापला संसदेची प्रतिकृती असलेला केक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 1:40 PM

सोशल मीडियावर फोटो व्हायरल; विरोधकांची सडकून टीका

आग्रा: अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आणि आग्र्याचे भाजपाखासदार डॉ. रामशंकर कठेरिया यांनी त्यांच्या जन्मदिनी संसदेची प्रतिकृती असलेला केक कापला आहे. त्यांच्या या कृतीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियानं कठेरियांवर टीकेची झोड उठवली आहे. संसदेची प्रतिकृती असलेला केप कापत असतानाचा कठेरिया यांचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. शुक्रवारी रामशंकर कठेरिया यांचा 54 वा वाढदिवस होता. या निमित्तानं त्यांनी तब्बल 54 किलोंचा केक कापला. या केकवर संसदेची प्रतिकृती होती. केकवरील संसदेवर तिरंगादेखील लावण्यात आला होता. मात्र केक कापण्याआधी तो काढण्यात आला. संसद भवन, त्यासमोरील रस्ता, त्यावरुन जाणाऱ्या गाड्या, आसपासची हिरवळ केकवर दाखवण्यात आली होती. कठेरिया यांनी केक कापल्यानंतर त्यांच्या एका समर्थकानं केकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर हा फोटो व्हायरल झाला. संसदेची प्रतिकृती असलेला केक कापल्यानं सोशल मीडियानं कठेरियांवर सडकून टीका केली. विरोधी पक्षांनीदेखील कठेरिया यांच्या या कृतीचा चांगलाच समाचार घेतला आहे. कठेरिया यांना राष्ट्रचिन्हाविषयीच आदर नाही. त्यामुळे त्यांनी अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. विश्व हिंदू परिषदेनंही कठेरियांचा निषेध केला आहे. भाजपानं कठेरियांवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केली आहे.  

टॅग्स :BJPभाजपाMember of parliamentखासदारParliamentसंसद