TajMahal Agra: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. मालकाच्या निष्काळजीपणामुळे पाळीव कुत्र्याचा तडफडून मृत्यू झाला. कुटुंबीय आपल्या परदेशी जातीच्या कुत्र्याला गाडीत सोडून ताजमहाल पाहण्यासाठी गेले. यावेळी कारमध्ये ठेवलेल्या कुत्र्याचा गरमीमुळे मृत्यू झाला.
मिळालेल्या माहतीनुसार, हरियाणातील एक कुटुंब ताजमहाल पाहण्यासाठी आले होते. यावेली त्यांनी ताजमहालच्या वेस्टर्न पार्किंगमध्ये कार पार्क केली आणि पाळीव कुत्रा हंस याला कारमध्येच ठेवले. गाडी उन्हात पार्क केली होती, त्यामुळे आतून गाडी खूप तापली. उन्हामुळे गाडीत बसलेला हंसची तब्येत बिघडली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
यावेली काही लोकांनी कारमध्ये कुत्रा मरुन पडल्याचे पाहिले. यातील एकाने व्हिडिओही शूट केला. यात हंसी तडफडून मेल्याचे दिसत आहे. गाडीत सर्वत्र त्याच्या नखांचे ओरखाडे दिसत आहेत, म्हणजेच त्याने जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केल्याचे दिसते. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. काही वेळाने कारचे मालकही पोहोचले. हंसच्या मृत्यूने कुटुंबाला खूप धक्का बसला. पोलीस पथक या कुटुंबाची चौकशी करत आहे. कुत्र्याचे शवविच्छेदनही केले जाणार आहे.