नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. भयंकर बाब म्हणजे डिजेच्या हादऱ्याने इमारत कोसळल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तब्बल 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ताजगंजमधील सोनू वर्मा यांच्या घरी त्यांचे मित्र अनिकेत चौधरी यांच्या बर्थ डे पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी अनेक लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवसासाठी लावलेल्या डीजेच्या आवाजाच्या धक्क्याने किंवा त्या गाण्यांच्या तालावर नाचणाऱ्या लोकांच्या वजनामुळे घराचं छप्पर कोसळलं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सोनू वर्मा याने हे 30 वर्षांपूर्वीचं घर विकत घेतलं होतं आणि त्याचं रिन्युएशन करण्याचं काम सुरू होतं. सोमवारी सोनूचा मित्र अनिकेत चौधरी याच्या वाढदिवसाची पार्टी सुरू होती. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या या पार्टीत 50 जण सहभागी झाले होते. यावेळी डीजेवर प्रचंड मोठ्या आवाजात गाणी लावली होती.
पार्टी सुरू असताना अचानक इमारत कोसळली. हा आवाज इतका जोरदार होता की परिसरातील लोक जमा झाले. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यावर ते लगेच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच 15 जखमींना बाहेर काढण्यात आलं असून काहींची प्रकृती गंभीर आहे. या घटनेने पार्टीमध्ये एकच गोंधळ उडाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बापरे! अंत्यसंस्कार सुरू असतानाच पोलीस आले अन् चितेवरून मृतदेहच घेऊन गेले; 'हे' आहे नेमकं कारण
देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना पुन्हा एकदा हरियाणात घडली आहे. गावातील एका महिलेची हत्या करण्यात आली होती. मात्र पोलिसांना याबाबत सुचना न देताच कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार सुरू करण्यात आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच चिता विझवून मृतदेह तपासणीसाठी ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. एका महिलेची हत्या झाल्यावर पुरावे मिटवण्यासाठी तिच्यावर घाईघाईत अंत्यसंस्कार उरकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.