नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. पती-पत्नीमध्ये काही कौटुंबिक कारणांवरून वाद झाल्याचा घटना या समोर येत असतात. पण त्यातील काही भांडणं ही काही वेळेस विकोपाला ही जातात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. आपल्या पत्नीला बर्थ डे विश न करणं एका पतीला चांगलंच महागात पडलं आहे. नाराज झालेल्या पत्नीने थेट पतीसोबत राहण्यास नकार दिला आहे. त्याच्यासोबतच नातं तोडण्याचाच निर्णय घेतला आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. पत्नीने टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबीय देखील हैराण झाले आहेत.
वाढदिवसाच्या दिवशी विश केलं नाही म्हणून नाराज झालेल्या पत्नीला पतीने खूप समजवण्याचा प्रयत्न केला. तिच्यासमोर हात जोडले. मात्र पत्नी काहीही ऐकून घेण्यास तयार नाही. तिने पतीसोबत एकत्र न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य आग्रा येथे राहणारं असून उच्चशिक्षित आहे. महिला पीएचडी करते आहे. तर तिचा नवरा कॉलेजमध्ये अकाऊंटट आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसांनी त्यांच्या छोटेमोठे वाद होतंच होते. पण पत्नीच्या वाढदिवशी वाद विकोपालाच गेला आणि पतीने बर्थ डे विश केलं नाही म्हणून पत्नी खूप नाराज झाली. पत्नीने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला.
नवऱ्याने हात जोडून माफी मागितली. नातं तोडू नको म्हणून विनवणी केली. तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पण बायकोने त्याचं काहीच ऐकलं नाही. ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. कौटुंबिक सल्ला केंद्रापर्यंत हे प्रकरण पोहोचलं. तिथे पतीविरोधात तिने तक्रार केली. महिलेने तीन वर्षांतील सर्व तक्रारी सांगितल्या. नवरा कोणतंही काम आईवडिलांना विचारल्याशिवाय करत नाही. यावरून त्यांच्यात वाद होत होतेच. याच भांडणाला वैतागलेला पती पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरला. या दाम्पत्याचं समुपदेशन करण्यात आलं. अद्यापही या दाम्पत्यातील वाद मिटलेला नाही. त्यांना आता समुपदेशनासाठी दुसरी तारीख देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दिल्ली हादरलं! 9 वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या, जबरदस्तीने केले अंत्यसंस्कार; परिसरात खळबळ
दिल्लीमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भयंकर बाब म्हणजे आरोपींनी मुलीवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार देखील केले आणि तिच्या कुटुंबाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली. तसेच पोलिसांना याबाबत माहिती देऊ नका असं देखील तिच्या कुटुंबीयांना सांगितलं. दिल्ली कंटोनमेंट परिसरातील नांगल गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तसेच याची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.