नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या लखनऊ-आग्रा महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 18 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कन्नौजमध्ये बसचा भीषण अपघात झाला. जवळपास 50 जण या बसमधून प्रवास करत होते अशी माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (19 जुलै) सकाळी लखनऊ-आग्रा महामार्गावर बिहारहून कामगारांना घेऊन एक बस दिल्लीकडे जात होती. त्याचदरम्यान कन्नौज जवळ उभ्या असलेल्या एका कारला भरधाव वेगाने आलेल्या बसने धडक दिली. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.
बस आणि कारची जोरदार धडक झाल्याने ही वाहनं महामार्गावरून खाली पडल्याची माहिती मिळत आहे. लोकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील लोक मदतीसाठी पुढे आले. त्यांनी पोलीस आणि प्रशासनानला देखील अपघाताची माहिती दिली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. तसेच जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : मच्छर चावल्याने खरंच कोरोनाची लागण होते?; रिसर्चमधून समोर आली महत्त्वाची माहिती
'मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल'; राहुल गांधींचा हल्लाबोल
"कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या", भाजपा नेत्याचा अजब सल्ला
CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनाग्रस्त चिमुकल्यांमध्ये दिसताहेत 'या' गंभीर आजाराची लक्षणं
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात आशेचा किरण! ऑक्सफर्डला मिळालं आणखी एक मोठं यश
कोरोनाचा धसका! आपलेही झाले परके... पतीचा मृतदेह हातगाडीवरुन नेऊन पत्नीने केले अंत्यसंस्कार