शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

शिवाजी महाराजांच्या नावे आता आग्र्यातील मुघल म्युझियम, भाजपानं सेनेला घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 1:47 PM

योगी सरकारच्या या निर्णयाचे छत्रपती शिवाजी वंशज आणि राज्यसभेचे खासदार संभाजी छत्रपती यांनी कौतुक केले आहे.

उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने सोमवारी आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलले आहे. आता हे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय म्हणून ओळखले जाणार आहे. या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. योगी सरकारच्या या निर्णयाचे छत्रपती शिवाजी वंशज आणि राज्यसभेचे खासदार संभाजी छत्रपती यांनी कौतुक केले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि राज्यसभेचे खासदार संभाजी छत्रपती यांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, उत्तर प्रदेश सरकारने मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असे करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतीक म्हणून मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस बीएल संतोष यांनीही या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करण्याचा हा योग्य मार्ग आहे. मुख्यमंत्री योगी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने एक संग्रहालयाचे नाव ठेवले आहे, तर काही लोक त्यांच्या वारशाचा दावा करणारे साधू, महिला, पत्रकार आणि दिग्गजांवर अत्याचार करतात.यासंदर्भात कॉंग्रेस नेते दीपक सिंह म्हणाले की, उत्तर प्रदेशातील भाजपा सरकार नाव बदलण्यासाठी नव्हे तर काम बदलण्यासाठी आले होते. भारतीय जनता पार्टी सरकार ज्या महापुरुषांची नावं घेते, जर त्यांनी त्यांचं अनुसरण केलं असतं तर भाजपाचे पाप कमी झाले असते.सोमवारी या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट केले. सीएम योगी यांनी लिहिले की, आग्र्यामध्ये निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाईल. आपल्या नवीन उत्तर प्रदेशात गुलामगिरीच्या मानसिकतेच्या चिन्हांना स्थान नाही. आमचे नायक शिवाजी महाराज आहेत. जय हिंद जय भारत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चित्रपट अभिनेत्री कंगना रनौत यांनीही योगी सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले. मराठा हा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात चर्चेत आहे. दरम्यान, योगी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती