उत्तर प्रदेशचे पोलीस सतत चर्चेत असतात. कधी त्यांच्या कृतीबद्दल तर कधी त्यांच्या अनोख्या कामांबद्दल. पुन्हा एकदा आग्राचे पोलीस चर्चेचा विषय ठरले आहेत. एका वृद्ध आईने आपल्या मुलाची तक्रार घेऊन पोलीस आयुक्तालय गाठले होते, वृद्ध आईने पोलीस आयुक्तांना सांगितले होते की, आपल्या मुलाने कडाक्याच्या थंडीत आपल्याला घराबाहेर हाकलून दिले होते.
आयुक्तांनी वृद्ध आईसह स्टेशन प्रभारींना तातडीने घरी पाठवले आणि घराचे कुलूप उघडून पोलिसांनी पुन्हा एकदा आईला घरात स्थान मिळवून दिले. मिळालेल्या माहितीनुसार, 80 वर्षीय महिला तक्रार पत्र घेऊन पोलीस आयुक्तांसमोर हजर झाली. वृद्ध महिलेला तिच्या मुलाने थंडीच्या दिवसात घराबाहेर फेकले आणि घराला कुलूप लावले. याबाबत महिलेने पोलीस आयुक्त डॉ. प्रीतिंदर सिंह यांच्याकडे तक्रार केली असता.
अधिकाऱ्यांनी तातडीने पोलीस स्टेशन दुसऱ्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आणि एसएचओसह त्यांच्या स्वत:च्या गाडीतून वृद्ध महिलेला तिच्या घरी पाठवले. पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून पोलीस ठाण्याने घराचे कुलूप उघडून वृद्ध महिलेला पुन्हा एकदा घरात जागा मिळवून दिली. मात्र, मुलाच्या या लज्जास्पद कृत्याबाबत पोलीस ठाण्यालाही सूचना दिल्या. त्यानंतर आईने मुलावर कारवाई करण्यास नकार दिला.
या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस आयुक्त डॉ. प्रीतिंदर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडी परिसरात राहणारी वृद्ध आई आपल्या मुलाबाबत तक्रार घेऊन आली होती. आपल्या मुलाने आपल्याला घरातून हाकलून दिल्याचे तिने सांगितले होते. संबंधित स्टेशन प्रभारींसह त्यांना सरकारी वाहनातून त्यांच्या घरी नेण्यात आले. पुन्हा एकदा त्यांना त्यांचे घर मिळाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"