ैग्राम बालविकास केंद्रे योजना पुन्हा सुरू करावीत
By admin | Published: August 26, 2015 11:32 PM
विजयसिंह मोहिते-पाटील: दक्षता कमिटीच्या बैठकीस गैरहजर असणार्या अधिकार्यांना नोटिसा काढण्याच्या सूचना
विजयसिंह मोहिते-पाटील: दक्षता कमिटीच्या बैठकीस गैरहजर असणार्या अधिकार्यांना नोटिसा काढण्याच्या सूचना सोलापूर- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातून (एनआरएचएम) जिल्?ात कुपोषण निर्मूलनासाठी सुरू असलेली ग्राम बालविकास केंद्रे बंद करण्यात आली आहेत, ती पुन्हा सुरू करणे आवश्यक असून त्याबाबत शासनाला पत्रव्यवहार करावा अशा सूचना दक्षता समितीचे अध्यक्ष तथा खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिल्या़राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक शिवरत्न सभागृहात बुधवारी आयोजित केली होती़ यावेळी जि़प़ अध्यक्षा जयमाला गायकवाड, आ़ बबनराव शिंदे, आ़ गणपतराव देशमुख, आ़ हनुमंतराव डोळस, आ़ भारत भालके, जि़प़ उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, महिला व बालकल्याण समिती सभापती सुकेशिनी देशमुख, समाजकल्याण सभापती कल्पना निकंबे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी़व्ही़ बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ प?णशे?ी, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ़ सुनील भडकुंबे आदी उपस्थित होत़ेया बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कामांचा आढावा घेण्यात आला़ बालकुपोषणावर चर्चा करण्यात आली़ मागील पाच वर्षांत अर्भक मृत्यू दरात घट होऊन 23 वरुन 18 पर्यंत आले आह़े माता मृत्यूदरात वाढ झालेली नाही़ जिल्?ाचा जननदर 2़1 असून लिंग गुणोत्तरचे प्रमाण 862 पासून 928 पर्यंत वाढले आहे आदी माहिती देण्यात आली़ शासनाने 2015-16 या आर्थिक वर्षात ग्राम बालविकास केंद्रे योजना बंद करण्यात आली आहे तरी ही योजना सुरू करणे आवश्यक आहे व त्यानुसार शासनाशी पत्रव्यवहार करावा असे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितल़े शालेय विद्यार्थ्यांना आठवड्याला 1 लोहयुक्त गोळी देण्याची मागणी आ़ भालके यांनी केली़ आरोग्य विषयक सर्व कामे जिल्हाधिकारीस्तरावरुन चांगल्या पद्धतीने करावीत अशा सूचना यावेळी करण्यात आल्या़ सभेस नगरपालिकांचे नऊ पैकी सात मुख्याधिकारी उपस्थित नव्हते त्यांना नोटिसा काढण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या़ बैठकीस डॉ़ जयंती आडके, महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अहिरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ़ शीतलकुमार जाधव, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्याधिकारी डॉ़ अविनाश पाटील, प्रशासन अधिकारी आरिफ सय्यद, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ़ अमरसिंह जाधव, उपअभियंता शहाजहान शेख, जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात, जिल्हा आयुष्य अधिकारी डॉ़ विलास सरवदे, जिल्हा हिवताप अधिकारी शुभांगी आधटराव यांच्यासह सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्हा विस्तार अधिकारी रफिक शेख आदी उपस्थित होत़े बैठकीतील माहिती-गेल्या पाच वर्षांत अर्भक मृत्यूदर 23 वरून 18 पर्यंत आला.-मृत्यूदरात वाढ नाही़ लिंगगुणोत्तर प्रमाण वाढले.-आरोग्य संस्थेमध्ये प्रसूतीचे प्रमाण 99़8 टक्के.-शालेय विद्यार्थ्यांना आठवड्याला एक लोहयुक्त गोळी देण्याची मागणी. -गैरहजर अधिकार्यांना नोटिसा काढण्याच्या सूचना.फोटो आह़े़़़26 एचआर दक्षता समितीच्या बैठकीस बोलताना खा़ विजयसिंह मोहिते-पाटील, जि़प़ अध्यक्षा जयमाला गायकवाड, आ़ बबनराव शिंदे, आ़ गणपतराव देशमुख, आ़ हनुमंतराव डोळस, आ़ भारत भालके, जि़प़ उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, सुकेशिनी देशमुख, कल्पना निकंबे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी़व्ही़ बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ प?णशे?ी, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ़ सुनील भडकुंबे आदी.