नवी दिल्ली - केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी विरोधी पक्षातील वरिष्ठ नेते तथा NCP अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कृषी कायद्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. तोमर म्हणाले, "शरद पवार यांनी कृषी कायद्यांवर बोलताना म्हटले आहे, की सर्वच कायदे बदलण्याची आवश्यकता नाही. ज्या मुद्द्यांवर आक्षेप असेल, त्यावर विचार करून ते बदलायला हवेत." कृषी मंत्र्यांच्या या वक्तव्यारून, शरद पवार कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर सरकारला सहकार्य करत आहेत, असे दिसते. (Agri Minister Narendra Singh Tomar welcomes the stand of NCP chief Sharad Pawar on the farm laws)
शरद पवार गुरुवारी म्हणाले होते, शेतकरी 6 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. पण, शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात डेडलॉक झाले आहे आणि ते अजूनही तेथेच बसून आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चा करायला हवी." शरद पवार यांच्या या वक्तव्यावर कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हणटले आहे, की आपण शरद पवारांच्या या भूमिकेचे स्वागत करतो आणि सरकारही कुठल्याही मुद्यावर चर्चेतून मार्ग निघायला हवा, यावर सहमत आहे, असे म्हटले आहे.
शरद पवारही UPA सरकारमध्ये कृषी मंत्री होते आणि सध्याच्या मोदी सरकारने जे कायदे आणले आहेत, अगदी तसेच कायदे आणण्याची त्यावेळच्या यूपीए सरकारचीही इच्छा होती. त्यावेळी काँग्रेसकडूनही अगदी याच पद्धतीचे कायदे तयार करण्यासंदर्भात भाष्य करण्यात आले होते. पण, गेल्या वर्षी मोदी सरकारने हे नवे कृषी कायदे आणल्यानंतर, मात्र विरोधकांनी त्यांना विरोध करायला सुरुवात केली आहे.
सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे - शरद पवारपंजाब, हरियाणा आणि राजस्थानातील शेतकरी गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्यांची भूमिका तीव्र आहे. केंद्र सरकारसोबत त्यांच्या नऊ दहा बैठका झाल्या. त्यात तोडगा निघाला नाही. आता चर्चा करायलाही तयार नाहीत. याच बरोबर, भाजपच्या लोकांनी तेथे गोंधळ घातल्याचे ऐकले. सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे, असा सल्लाही शरद पवार यांनी सरकारला दिला आहे.