कृषी मंत्र्यांच्या जिल्ात कृषीची ३३६ पदे रिक्त अतिरिक्त भार : कृषी साहाय्यकांची सर्वाधिक १०८ पदे रिक्त
By admin | Published: March 23, 2016 12:10 AM
जळगाव : कृषी विभागात कामांचा व्याप वाढत असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात मंजूर असलेल्या एक हजार ७१ पदांपैकी तब्बल ३३६ पदे रिक्त आहेत. शेतात जाऊन मार्गदर्शन करणार्या कृषी सेवकांची सर्वाधिक १०८ पदे रिक्त आहे. कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जिल्ात मोठ्या प्रमाणात रिक्त पदांमुळे कृषी विभागात प्रभारी राज सुरू आहे.
जळगाव : कृषी विभागात कामांचा व्याप वाढत असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात मंजूर असलेल्या एक हजार ७१ पदांपैकी तब्बल ३३६ पदे रिक्त आहेत. शेतात जाऊन मार्गदर्शन करणार्या कृषी सेवकांची सर्वाधिक १०८ पदे रिक्त आहे. कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जिल्ात मोठ्या प्रमाणात रिक्त पदांमुळे कृषी विभागात प्रभारी राज सुरू आहे.एक हजार ७१ पदांना मंजुरीशासनाने नवीन आकृतीबंधानुसार जळगाव जिल्ात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासाठी एक हजार ७१ पदांना मंजुरी दिली आहे. त्याबाबतची माहिती या कार्यालयाने डिसेंबर महिन्यात शासनाला कळविली आहे.कृषी साहाय्यकांची १०८ पदे रिक्तशेतकरी आणि शासन यांच्यातील मध्यस्थाचे काम करणार्या कृषी साहाय्यकाची जिल्हाभरात तब्बल १०८ पदे रिक्त आहेत. यात जळगाव उपविभागात ३९, अमळनेर उपविभागात ३८, पाचोरा उपविभागात ३० तर जिल्हा मुख्यालयात एक कृषी साहाय्यकाचे पद रिक्त आहे. यासह कृषी पर्यवेक्षकाची २६ पदे रिक्त आहेत. यात जळगाव उपविभाग ७, अमळनेर उपविभाग ११, पाचोरा उपविभागात ७ रिक्त पदांचा समावेश आहे.रिक्त पदांमुळे वाढतो कामाचा ताणअमळनेर, जळगाव व पाचोरा या उपविभागातील महत्त्वाचे पदे रिक्त असल्याने पर्यायाने त्याच्या कामाचा भार हा अन्य कर्मचार्यांवर पडत आहेत. वरिष्ठ लिपीक, लिपीक, लघुलेखक, लघुटंकलेखक, अनुरेखक असे कार्यालयीन कामकाज करणार्या कर्मचार्यांची पदे रिक्त आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करणे, पंचनामे करणे यासह आता जलयुक्त शिवारचे कामे कृषी विभागाकडे देण्यात आले आहेत. अतिरिक्त कामाचा परिणाम हा कर्मचार्यांवरदेखील होत आहे. चौकटपदमंजूररिक्ततंत्र अधिकारी७०३तालुका कृषी अधिकारी१५०२कृषी अधिकारी२११२मंडळ कृषी अधिकारी३८१३कृषी पर्यवेक्षक१११२६कृषी साहाय्यक४९५१०८अधीक्षक०२०१साहाय्क अधीक्षक०९०६लिपीक६९२७अनुरेखक८०५७रोपमळा मदतनीस२०१६मजूर२५२५शिपाई ९४२४स्वच्छक१५७६९