शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
5
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
6
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
7
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
8
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
9
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
10
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
11
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
12
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
13
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
14
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
15
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
16
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
17
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
18
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
19
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका

मोठी बातमी! मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी आणणार 'सुपर अ‍ॅप'; सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 5:44 PM

केंद्रातील मोदी सरकार (Narendra Modi Government) देशातील शेतकऱ्यांसाठी एक सुपर अ‍ॅप (Super App For Farmers) लॉन्च करण्याची योजना आखत आहे.

केंद्रातील मोदी सरकार (Narendra Modi Government) देशातील शेतकऱ्यांसाठी एक सुपर अ‍ॅप (Super App For Farmers) लॉन्च करण्याची योजना आखत आहे. शेतकऱ्यांना त्यांचं पीक, उत्पादन, कापणीनंतरचं व्यवस्थापन, हवामान आणि बाजारातील अपडेट्स यासंदर्भातील सर्व सुविधा एकाच जागी उपलब्ध करुन देणं हा यामागचा उद्देश असणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना याच अ‍ॅपमधून सरकारकडून जारी केल्या जाणाऱ्या योजना, घोषणा आणि अ‍ॅडव्हायजरींची माहिती देखील मिळणार आहे. यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून वेगानं काम सुरू आहे. 

स्मार्टफोनची उपलब्धता आणि इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेता सरकारनं शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत अनेक अ‍ॅप लाँच केले आहेत. यातील प्रत्येक अ‍ॅप एखाद्या मुद्द्यावर लक्ष्य केंद्रीय करुन तयार करण्यात आलेले आहेत. अशावेळी वेगवेगळ्या विषयांसाठी आणि कामांसाठी वेगवेगळे अ‍ॅप वापरण्याऐवजी एकच सर्वसमावेशक अ‍ॅप असावं यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. एकाच अ‍ॅपमुळे शेतकऱ्यांनाही सोयीचं ठरेल आणि अनेक अ‍ॅप डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही. 

कृषी क्षेत्रातील सर्व माहिती एकाच ठिकाणीशेतकऱ्यांना रिसर्च, हवामान, बाजारातील अपडेट्स, सरकारी योजना, कृषी सेवा आणि देशातील विविध भागांसाठी माहिती देणाऱ्या कृषी अ‍ॅडवायझरी एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार किसान सुविधा, पुसा कृषी, एम किसान, शेतकरी मासिक अँड्राईड अ‍ॅप, फार्म-ओ-पीडिया, फसल बिमा अँड्रॉईड अ‍ॅप, अ‍ॅग्री मार्केट, इफको किसान आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदच्या कृषी ज्ञान सह अनेक अ‍ॅप्सचं मिळून एक सर्वसमावेशक अ‍ॅप भारत सरकार लाँच करणार आहे. 

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नुकतीच या अ‍ॅपच्या कार्यवाहीबाबत बैठक करुन माहिती जाणून घेतली आहे. येत्या काही आठवड्यात या अ‍ॅपचं अनावरण करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी