शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

अगुस्ता खरेदी :गोव्याच्या राज्यपालांचा राजीनामा

By admin | Published: July 05, 2014 5:25 AM

गोव्याचे राज्यपाल भारत वीर वांच्छू यांची अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी सकाळी चौकशी केल्यानंतर त्यांनी अखेर सायंकाळी राष्ट्रपतींकडे राजीनामा सादर केला.

पणजी : गोव्याचे राज्यपाल भारत वीर वांच्छू यांची अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी सकाळी चौकशी केल्यानंतर त्यांनी अखेर सायंकाळी राष्ट्रपतींकडे राजीनामा सादर केला. वांच्छू यांनी राजीनामा द्यावा, अशी सूचना केंद्रीय गृहसचिवांनी सायंकाळी राज्यपालांना केली होती. त्यानंतर त्यांनी राजीनामा पत्र राष्ट्रपतींच्या कार्यालयास फॅक्स केल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रपतींकडून हे पत्र केंद्रीय गृह मंत्रालयास पाठविले जाईल. गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून कोण सूत्रे हाती घेतील ते अजून स्पष्ट झालेले नाही. वांच्छू यांच्या राजीनाम्याची चर्चा काही दिवस होती, अखेर ती खरी ठरली.फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६१ नुसार सीबीआयने शुक्रवारी वांच्छू यांचा साक्षीदार या नात्याने जबाब नोंदविला. माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांचाही सीबीआयने साक्षीदार म्हणून काही दिवसांपूर्वी जबाब घेतला होता. त्यानंतर तीनच दिवसांत नारायणन यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. वांच्छू काही दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना भेटले होते. या भेटीत त्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शविली होती, असे समजते. (प्रतिनिधी)