ख्रिश्चिअन मिशेलने घेतले सोनिया गांधी यांचे नाव; इटालियन महिलेच्या मुलाचाही उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 06:27 PM2018-12-29T18:27:00+5:302018-12-29T18:27:40+5:30
सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) न्यायालयाला सांगितले
नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड व्यवहारातील दलाल ख्रिश्चिअन मिशेल याने चौकशीदरम्यान सोनिया गांधी यांचं आणि इटलीच्या महिलेच्या मुलाचे नाव घेतल्याचे सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) न्यायालयाला सांगितले आहे. मिशेलने इटालियन महिलेच्या मुलाचाही उल्लेख करत तो कशाप्रकारे देशाचा पुढील पंतप्रधान होईल याबद्दल सांगितलं.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला वगळून हा करार टाटासोबत कशा पद्घधतीने करण्यात आला हेदेखील त्याने सांगितलं आहे’, अशी माहिती ईडीने न्यायालयात दिली. सोनिया गांधी यांचे नाव कशासाठी घेतले हे सध्या सांगू शकत नाही, असेही इडीने स्पष्ट केले.
Agusta Westland case: Delhi's Patiala House Court orders Christian Michel’s lawyers to maintain a distance while meeting him. Court restricts the time limit of lawyers to meet Michel to 15 minutes every morning and evening.
— ANI (@ANI) December 29, 2018
Agusta Westland case: Delhi's Patiala House Court sends alleged middleman Christian Michel to seven-day ED remand pic.twitter.com/irZyb3ofPg
— ANI (@ANI) December 29, 2018
काय आहे ऑगस्टा हेलिकॉप्टर घोटाळा?
भारताने इटलीच्या सरकारी मालकीच्या फिनमेकॅनिका या कंपनीची उपकंपनी असलेल्या ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून ‘एडब्ल्यू 101’ प्रकारातील 12 हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार 2010 साली केला. हा करार 3,546 कोटी रुपयांचा होता. त्यातील 8 हेलिकॉप्टर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी तर 4 अन्य कारणांसाठी वापरली जाणार होती.
ED in Delhi's Patiala House court: We need to decipher who the “big man” referred to as “R” is in the communication between Christian Michel and other people. We need to confront Michel with other people to decipher who “the big man” or “R” is. #AgustaWestland
— ANI (@ANI) December 29, 2018
Michel’s lawyer Aljo K Joseph to court: Michel Christian had query regarding something&how legal response needs to be given.He tried to give us something, we didn’t see what it was,It was immediately pointed out that he was slipping us a paper&paper was taken away #AgustaWestland
— ANI (@ANI) December 29, 2018
पूर्वीची रशियन एमआय-8 ही होलिकॉप्टर आता कालबाह्य ठरू लागल्याने ती बदलण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. 1999 साली प्रथम ही मागणी झाली. 2005 साली त्यासाठी निविदा जाहीर करण्यात आल्या. या पहिल्या निविदांमध्ये 6000 मीटर उंचीवर काम करू शकतील अशी हेलिकॉप्टर हवी असल्याची अट घालण्यात आली होती. उंचीची (सव्र्हिस सीलिंग) ही अट संरक्षण मंत्रालयाने 2006 साली शिथिल करून 4500 मीटरवर आणली. त्यामुळे या स्पर्धेतील अमेरिकेच्या सिकोस्र्की कंपनीच्या ‘एस-92 सुपरहॉक’ हेलिकॉप्टरची संधी हुकली असे म्हटले जाते. निवडीसाठीच्या या अटी बदलल्याने इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला फायदा झाला आणि अटी बदलण्यात हवाई दलाचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल एस. पी. त्यागी यांचा हात असल्याचा संशय आहे.
या व्यवहारात लाचखोरी झाल्याचं 2012 मध्ये समोर आलं. घोटाळ्याच्या गदारोळानंतर 2013 मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री ए के अँटोनी यांनी भ्रष्टाचार झाल्याचं कबूल करत, हा सौदाच रद्द केला होता. फिनमेकॅनिका आणि ऑगस्टा वेस्टलँड कंपनीने भारताकडून हे कंत्राट मिळवण्यासाठी इटली व भारतात अनेकांना सुमारे 423 कोटी रुपयांची लाच दिल्याचा संशय व्यक्त करून इटलीच्या अॅटर्नी जनरल कार्यालयाने चौकशी सुरू केली. सीबीआयने मार्च 2013 मध्ये 18 संशयितांविरोधात एफआयआर दाखल केली. सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्टअंतर्गत तपास सुरू केला.
Michel’s lawyer Aljo K Joseph to court: We don’t dispute that he (Christian Michel) had handed us the papers, but it’s the fault of the ED that they allowed it to happen. #AgustaWestlandhttps://t.co/HcjjTq0lba
— ANI (@ANI) December 29, 2018
ED in Delhi's Patiala House court: Christian Michel has also spoken about “the son of the Italian lady” and how he is going to become the “next prime minister of the country. #AgustaWestland
— ANI (@ANI) December 29, 2018
Agusta Westland case: ED tells Delhi's Patiala House court that Christian Michel has identified how HAL was removed from the deal and the deal was offered to Tata instead. ED also seeks to ban Michel's lawyer's access to him alleging he is being tutored from outside https://t.co/xvQSaJnyxH
— ANI (@ANI) December 29, 2018
भारताने 1 जानेवारी 2014 रोजी हा करार रद्द केला. तोपर्यंत करारातील 3 हेलिकॉप्टर भारताला मिळाली होती. करार रद्द होईपर्यंत भारताने कंपनीला 1620 कोटी रुपये दिले होते आणि जानेवारी 2014 मध्ये भारतीय बँकांमध्ये हमी म्हणून ठेवलेले 250 कोटी रुपये परत घेतले होते.
इटलीच्या 'फिनमेक्कनिका' कंपनीने 12 ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरच्या सौद्यापोटी माजी वायुसेना प्रमुख एस. पी. त्यागी यांच्यासह त्यांच्या तीन नातेवाईंकाना लाच दिल्याचा आरोप आहे.