डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 08:57 AM2024-09-21T08:57:25+5:302024-09-21T08:59:13+5:30

जेडीएसला कमकुवत करणे, चन्नपटनामध्ये काँग्रेसला मजबूत करण्यासाठी डीके शिवकुमार यांनी हे पाऊल उचललं आहे

Ahead of By-Poll, 13 JDS Councillors Defect to Congress, Checkmate by D K Shivakumar | डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

बंगळुरू - जनता दल सेक्यूलरला कर्नाटकात मोठा धक्का बसला आहे. चन्नपटना सिटी म्युनिसिपल कौन्सिलमध्ये जेडीएसच्या १६ पैकी १३ नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षांतर कायद्यापासूनही या नगरसेवकांची सुटका झाली आहे. १६ पैकी १३ नगरसेवकांनी हा निर्णय घेतल्यानं दोन तृतीयांश बहुमत झाले आहे. इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवकांना काँग्रेसमध्ये सामावून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची रणनीती मानली जात आहे.

जेडीएसला कमकुवत करणे, चन्नपटनामध्ये काँग्रेसला मजबूत करण्यासाठी डीके शिवकुमार यांनी हे पाऊल उचललं आहे. चन्नपटना एक वोक्कालिगा बहुल तालुका आहे. ज्याठिकाणी दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक आहे. ही राजकीय उलथापालथ चन्नपटना विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी झाली आहे. चन्नपटना विधानसभा जागेवर एचडी कुमारस्वामी आमदार होते, परंतु ते मांड्या लोकसभा जागेवरून खासदार म्हणून निवडून आल्याने ही जागा रिक्त झाली. 

शिवकुमार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी चन्नपटना पोटनिवडणुकीकडे व्यक्तिगत लक्ष दिले आहे. कारण याठिकाणी त्यांचे बंधू डिके सुरेश जे बंगळुरू ग्रामीण लोकसभा मतदारसंघात भाजपा जेडीएस युतीकडून पराभूत झाले होते त्यांचा बदला घ्यायचा आहे. ३१ सदस्यीय चन्नपटना सिटी म्युनिसिपल कौन्सिलसाठी २०२१ मध्ये निवडणूक झाली होती. त्यात जेडीएस १६, काँग्रेस-भाजपा यांचे प्रत्येकी ७ आणि एक अपक्ष उमेदवार निवडून आला होता. आता जेडीएसच्या १३ नगरसेवकांनी आणि एका अपक्षाने काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केल्यानं इथलं राजकीय समीकरण बदलले आहे.

दरम्यान, डीके शिवकुमार यांच्या मोठ्या खेळीनंतर चन्नपटना पोटनिवडणुकीवर परिणाम होईल असं बोललं जाते. याठिकाणी आता काँग्रेस प्लसमध्ये आहे तर दुसरीकडे भाजपा आणि जेडीएस यांच्यात उमेदवार कोण असेल यावरून संघर्ष सुरू आहे. भाजपाचे माजी मंत्री सीपी योगेश्वर याठिकाणी उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. तर जेडीएसला त्यांचा उमेदवार रिंगणात उतरवायचा आहे. 
 

Web Title: Ahead of By-Poll, 13 JDS Councillors Defect to Congress, Checkmate by D K Shivakumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.