शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पुजारी आणि सेवकांना 'अच्छे दिन', पगार झाले दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 8:24 PM

राम मंदिरातील पुजारी आणि सेवकांच्या वेतनात मोठी वाढ करण्यात आली आहे. 

अयोध्या: मागील काही दशकापासून देशाचे राजकारण ज्या वास्तूभोवती फिरत होते ती वास्तू म्हणजे उत्तर प्रदेशामधील अयोध्येतील राम मंदीर. पण, आता तिथे भव्य मंदीर होत असून नवीन वर्षात भाविकांना प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. राम मंदिराच्या उभारणीमुळे तेथील पुजाऱ्यांना 'अच्छे दिन' आल्याचे दिसते. खरं तर मंदिरातील पुजारी आणि सेवकांच्या वेतनात मोठी वाढ करण्यात आली आहे. 

दरम्यान, आता मुख्य पुजाऱ्याचे वेतन ३२,९०० रुपये आणि सहाय्यक पुजाऱ्याचा पगार ३१,९०० रुपये करण्यात आला आहे. पूर्वी मुख्य पुजाऱ्याला २५ हजार आणि सहाय्यक पुजाऱ्याला २० हजार रुपये मिळत होते. तसेच इतर पुजारी आणि सेवकांच्या पगारातही वाढ करण्यात आली आहे.

पुजारी आणि सेवकांना 'अच्छे दिन'राम मंदीर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी लवकरच पुजारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बोर्डिंग आणि वैद्यकीय सुविधांसोबतच पुजाऱ्यांना निवासी भत्ताही दिला जाणार असल्याचे समजते. 

ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यापूर्वी येथील मुख्य पुजारी आणि सहाय्यक पुजारी यांचे पगार खूपच कमी होते. त्या काळात मुख्य पुजाऱ्यांना केवळ १५,५२० रुपये तर सहाय्यक पुजाऱ्यांना ८,९४० रुपये एवढा पगार मिळत होता. वाढती महागाई पाहता मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पगार वाढवण्याची मागणी केली होती. ही बाब लक्षात घेऊन ट्रस्टने मे महिन्यात पहिली वेतनवाढ दिली आणि मुख्य पुजाऱ्यांना २५ हजार आणि सहाय्यक पुजाऱ्यांना २० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा ऑक्टोबर महिन्यात मुख्य पुजाऱ्यांचा पगार २५ हजारांवरून ३२ हजार ९०० रुपये तर त्यांच्या सहाय्यक पुजाऱ्यांचा पगार ३१,००० रुपये करण्यात आला आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या