संसदेच्या विशेष अधिवेशनाआधी विरोधक गोंधळात, सतावतेय 'या' गोष्टीची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 09:04 AM2023-09-18T09:04:25+5:302023-09-18T09:05:45+5:30

Parliament Special Session 2023: पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनात ४ विधेयके 'लिस्टेड'

Ahead of the special session of Parliament, the opposition is in turmoil, worrying about what Modi government will do | संसदेच्या विशेष अधिवेशनाआधी विरोधक गोंधळात, सतावतेय 'या' गोष्टीची चिंता

संसदेच्या विशेष अधिवेशनाआधी विरोधक गोंधळात, सतावतेय 'या' गोष्टीची चिंता

googlenewsNext

Parliament Special Session 2023: आजपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होत आहे. आज पहिल्या दिवशी जुन्या संसद भवनात विशेष अधिवेशनाचे कामकाज सुरू होणार आहे. उद्या म्हणजेच गणेश चतुर्थीपासून विशेष अधिवेशन नवीन संसद भवनात हलवले जाईल. सरकारकडे 4 विधेयके आहेत पण पडद्यामागील वास्तव काही वेगळेच आहे असा अंदाज विरोधक लावत आहेत. संसदेचे ५ दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून जुन्या संसद भवनात सुरू होत आहे. आज पहिल्या दिवशी संविधान सभेपासून आजपर्यंतच्या जुन्या संसद भवनाचा 75 वर्षांचा प्रवास, उपलब्धी, अनुभव, आठवणी इत्यादी विषयांवर चर्चा होणार आहे. मंगळवारी शेवटच्या वेळी संसदेचे कामकाज जुन्या संसद भवनात होणार आहे. 19 सप्टेंबर रोजी जुन्या संसद भवनात विद्यमान खासदारांचे फोटो सेशन होणार आहे. यानंतर सेंट्रल हॉलमध्ये एक कार्यक्रम होईल आणि त्यानंतर संपूर्ण संसद नवीन इमारतीत प्रवेश करेल. या दरम्यान, विरोधकांच्या म्हणण्यानुसार, सरकार कायदा बाजूला ठेवून काही गोष्टी करून घेईल अशी चिंता त्यांना सतावते आहे.

ही 4 विधेयके विशेष अधिवेशनात सूचीबद्ध आहेत

विशेष अधिवेशनात 4 विधेयके सूचीबद्ध आहेत, ज्यात मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित विधेयकाचा समावेश आहे. अधिवेशनाची रणनीती ठरविण्यासाठी विरोधी आघाडीची सकाळी १० वाजता बैठक होणार आहे. भाजप आणि काँग्रेसने त्यांच्या सर्व खासदारांना व्हीप जारी करून पाच दिवस संसदेत उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी

विशेष अधिवेशनासंदर्भात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी केली. सरकारमधील काही सहयोगी पक्षही या मागणीसोबत आहेत. मात्र याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे.

विरोधी पक्ष गोंधळात

विशेष अधिवेशनाच्या अजेंड्याबाबत संभ्रमात असलेल्या विरोधी पक्षांना सरकारने विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करावे, अशी इच्छा आहे. सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी ही मागणी सरकारसमोर मांडली. विशेष अधिवेशनात फक्त 4 विधेयकांवर चर्चा होणार की आणखी काही विधेयकांवर किंवा मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. याबाबत सरकारने आपल्या गोष्टी पूर्णपणे उघड केलेल्या नाहीत. महिला आरक्षण विधेयकावर सरकारने योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे.

विरोधकांची बैठक होणार

विशेष म्हणजे मोदी सरकारचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटालाही महिला आरक्षण विधेयक मंजूर करून संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व्हावे, अशी इच्छा आहे. मात्र संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधकांची बैठक होणार असून, त्यात सभागृहाच्या कामकाजाबाबत पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे. संसद भवनातील विरोधी पक्षाच्या कार्यालयात सकाळी १० वाजता राज्यसभेतील नेत्यांची बैठक होणार आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत विरोधी पक्षनेते सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत. विशेष अधिवेशनात येण्याची शक्यता असलेल्या विधेयकांबाबत विरोधक सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. 'सरकारला विधेयक आणू द्या, आम्ही त्यावर नक्कीच लक्ष ठेवून आहोत, सरकार कायद्याला बगल देऊन विधेयक आणेल', अशा प्रकारच्या भावना विरोधकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

Web Title: Ahead of the special session of Parliament, the opposition is in turmoil, worrying about what Modi government will do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.