“वाट पाहून दमलो, आता सर्व पर्याय खुले”; अहमद पटेलांचा मुलगा काँग्रेस सोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 01:25 PM2022-04-05T13:25:56+5:302022-04-05T13:27:00+5:30

फैसल पटेल यांनी दिलेला इशारा गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या चिंता वाढवणारा ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.

ahmed patel son faisal patel said tired of waiting around and keeping my options open | “वाट पाहून दमलो, आता सर्व पर्याय खुले”; अहमद पटेलांचा मुलगा काँग्रेस सोडणार?

“वाट पाहून दमलो, आता सर्व पर्याय खुले”; अहमद पटेलांचा मुलगा काँग्रेस सोडणार?

Next

नवी दिल्ली:काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचा मुलगा फैसल पटेल पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. खुद्द फैसल पटेल यांनीच तसे संकेत दिले आहेत. यासंदर्भात एक ट्विट करत फैसल यांनी काँग्रेस हायकमांडवरील नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकांच्या (Gujarat Election 2022) पार्श्वभूमीवर विविध पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून, फैसल यांनी उघड केलेली नाराजी काँग्रेससाठी धोकादायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे. 

दीर्घ आजारानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे नोव्हेबंर २०२० मध्ये निधन झाले होते. मागील गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली होती. अहमद पटेल गांधी कुटुंबातील विश्वासू सहकारी मानले जात होते. मात्र, फैसल यांच्या ट्विटनंतर काँग्रेसच्या चिंतेत भर पडू शकते, असे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून फैसल काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात होते. मात्र, फैसल यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने ते पक्षावर नाराज झाले आहेत. ही नाराजी त्यांनी उघडपणे व्यक्त केल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

वाट पाहून दमलो, आता सर्व पर्याय खुले

फैसल यांनी एक ट्विट करत अप्रत्यक्षपणे काँग्रेसला इशारा दिला आहे. आता वाट पाहून दमलो आहे. सर्वोच्च नेतृत्वाकडून प्रोत्साहन मिळालेले नाही. माझ्या बाजूने सर्व पर्याय खुले ठेवले आहेत, असे ट्विट फैसल यांनी केले आहे. काही महिन्यांपूर्वी फैसल यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. त्यामुळे फैसल काँग्रेसला रामराम करून आम आदमी पक्षात प्रवेश करू शकतात, अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. 

दरम्यान, राजकारणात येण्याविषयी आताच ठामपणे सांगू शकत नाही. भरूच आणि नर्मदा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात दौरा करणार आहे. माझी सहकारी आणि आमची टीम राजकीय परिस्थितीचे आकलन करेल आणि आमची मुख्य उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असल्यास मोठे बदल करेल, असे फैसल पटेल यांनी म्हटले अलीकडेच म्हटले होते. 
 

Web Title: ahmed patel son faisal patel said tired of waiting around and keeping my options open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.