नडियाद : अहमदाबाद-बडोदा महामार्गावर भरधाव जाणाऱ्या एका कारने थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात, एका बालकासह दहा जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गुजरातमधील खेडा जिल्ह्यातल्या नडियाद शहराजवळ बुधवारी घडली. महाराष्ट्रात नोंदणी असलेला ट्रक पुण्याहून जम्मूला जात होता. तांत्रिक बिघाड झाल्याने तो रस्त्याच्या डाव्या बाजूस कडेला उभा केला होता. मागाहून भरधाव वेगाने आलेल्या कारने ट्रकला जोरदार धडक दिली.
अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांना जखमींना नडियादच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. पण, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कारमधील प्रवासी बडोद्यावरून अहमदाबादला चालले होते. कारमधील प्रवाशांमध्ये काही बडोदा तर काही जण नडियाद, अहमदाबादचे रहिवासी होते. अपघातातील मृतांपैकी अद्याप फक्त चार जणांची ओळख पटली आहे.
तांत्रिक बिघाडामुळे ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केला होता. बडोद्यावरून अहमदाबादला निघालेली भरधाव कारने ट्रकला जोरदार धडक दिली.