गुजरातमधील अहमदाबाद येथे एका भरधाव जग्वार कारने 9 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. अपघाताचा व्हिडिओही आता समोर आला आहे. ही भरधाव कार येथील उड्डाणपुलावर अपघातस्थळी उभ्या असलेल्या गर्दीत शिरली. यात नऊ जणांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली.
पोलिसतील एका अधिकाऱ्याने दिलेल्या महितीनुसार, सरखेज-गांधीनगर राजमार्गावरील इस्कॉन पुलावर दोन वाहनांची धडक झाल्याने तेथे लोक जमले होते. त्याच वेळी एक भरधाव कार जमलेल्या लोकांमध्ये शिरली. तसेच, ही कार ताशी 100 किलोमीटरच्या स्पीडने होती, असे बोलले जात आहे. स्थानिकांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये बोटाद आणि सुरेंद्रनगर येथील लोकांचा समावेश आहे.
बोलले जात आहे की, ही कार जवळपास 150 च्या स्पीडने होती. कारने धडक दिल्यानंतर काही लोक हावेत उडून 25-30 फूटांपर्यंत फेकले गेले. रस्त्यावर दूरवर रक्त पसरले होते. कारचा पुढील भाग पूर्णपणे खराब झाला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत घोषित केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास इस्कॉन ब्रिज झाला. सरखेज-गांधीनगर महामार्गावर एका भरधाव जग्वार कारने लोकांना कुचलले. यापूर्वी तेथे एका ट्रकचा आणि थारचा अपघात झाला होता.