अहमदाबाद - गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने आज 19 व्या दिवशी आपले उपोषण समाप्त केले. पाटीदार समजाला आरक्षण मिळावे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी गेल्या 18 दिवसांपासून हार्दिक पटेलचे उपोषण सुरू होते. गुजरातमधील शेतकरी बांधवांची कुलदेवता श्री उमिया माताजी मंदिर-उंझा आणि श्री खोडल माताजी मंदिर-कागवडच्या प्रमुख लोकांनी मला उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यामुळेच मी हे उपोषण मागे घेत असल्याचे हार्दिक पटेलने म्हटले आहे.
Hardik Patel Health Update: हार्दिक पटेलची तब्येत ढासळली, डॉक्टरांनी दिला रुग्णालयात नेण्याचा सल्ला
हार्दिक पटेलने बुधवारी दुपारी 3 वाजता आपले आंदोलन समाप्त केले. गुजरातमधील शेतकरी बांधवांची कुलदेवता श्री उमिया माताजी मंदिर-उंझा आणि श्री खोडल माताजी मंदिर-कागवडच्या प्रमुख लोकांनी मला उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच जिंवत राहून आपल्या मागण्या मागण्या करुन घ्यायच्या आहेत, असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे आज 19 व्या दिवशी मी आपले उपोषण मागे घेत असल्याचे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. त्यामुळे कुठल्याही मागण्या मान्य न होता, हार्दिक पटेल यांच्यावर उपोषण मागे घेण्याची वेळ आली असेच दिसून येते.