शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

रक्षाबंधनाच्या दिवशी 'ती' मुस्लिम मुलगी श्रीनगरमधल्या लाल चौकात फडकावणार तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2017 12:21 PM

गुजरातमधल्या एका 14 वर्षांच्या मुस्लिम मुलीनं श्रीनगरमधल्या लाल चौकात भारताचा तिरंगा फडकावण्याचा निर्धार केला आहे.

अहमदाबाद, दि. 4 - गुजरातमधल्या एका 14 वर्षांच्या मुस्लिम मुलीनं श्रीनगरमधल्या लाल चौकात भारताचा तिरंगा फडकावण्याचा निर्धार केला आहे. तंजीम मेरानी ही मुलगी रक्षाबंधनाचा सण सीमेवरच्या जवानांसोबत साजरा करणार आहे. तंजीम म्हणाली, मी जवानांना राखी बांधणार आहे. गेल्या वर्षी मला विमानतळावरच अडवण्यात आलं होतं आणि मी तिथेच तिरंगा फडकावला होता.या वर्षी मी श्रीनगरमधल्या लाल चौकात तिरंगा फडकावणार आहे. बहीण-भावासाठी असलेल्या सणाच्या दिवसाची त्यासाठी निवड केली आहे. रक्षाबंधनाचा हा सण नियंत्रण रेषेवर भारताच्या सीमेचं रक्षण करणा-या जवानांसोबत साजरा करण्याचा मी निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे तंजीमच्या या निर्णयाला कुटुंबीयांनीही पाठिंबा दिला आहे. तंजीमच्या वडिलांनी मात्र काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या सुरू असलेल्या उद्व्यापाच्या परिस्थितीत श्रीनगरमध्ये जाणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे.ते म्हणाले, काश्मीरमध्ये जाण्यासाठी ही योग्य वेळ नाही. मात्र योग्य वेळेसाठी आम्ही कधीपर्यंत वाट पाहणार ?, कोणाला ना कोणाला तरी यासाठी एक पाऊल पुढे टाकावंच लागणार आहे. ज्याप्रमाणे आता माझ्या मुलीन पाऊल उचललं आहे. मी सर्वांना विचारू इच्छितो की, हिंदू-मुस्लिमांमध्ये ही भिंत कोणी बांधली. काय आपल्या रक्ताचा रंग वेगवेगळा आहे. हा एक सण आहे. तसेच आम्हाला कुठेही येण्या-जाण्याची स्वातंत्र्यता आहे. मी माझ्या मुलीसोबत उभा आहे. हा एक सण असल्यामुळे त्याला हिंदू-मुस्लिम यांच्या चष्म्यातून पाहायला नको. गेल्या वर्षीसुद्धा तंजीम श्रीनगरमधल्या लाल चौकात तिरंगा फडकावणार होती. मात्र 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सुरक्षा व्यवस्थाही कडेकोट ठेवण्यात आली होती. त्यामुळे तिला लाल चौकात तिरंगा फडकावण्याची परवानगी मिळाली नव्हती.  

काश्मिरी जनतेला विशेषाधिकार देणा-या घटनेतील कलम 35 (अ) मध्ये हस्तक्षेप केल्यास गंभीर परिणाम होतील, तिरंग्याचे रक्षण करण्यासाठी काश्मिरात कोणीही नसेल, असा इशारा मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिला होता. घटनेच्या 35 (अ) कलमान्वये जम्मू-काश्मीरचे ‘कायम निवासी’ कोण, हे ठरविण्याचा हक्क राज्याच्या विधानसभेला आहे, तसेच या कायम निवासी नागरिकांना विशेष हक्क आहेत. मेहबुबा यांनी घटनेतील या कलमाचे समर्थन केले. त्या म्हणाल्या की, यात बदल केल्यास जम्मू-काश्मिरात तिरंगा फडकणार नाही. नॅशनल कॉन्फरन्स व पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीच्या कार्यकर्त्यांचे जीवित धोक्यात येईल. हे कार्यकर्तेच ठामपणे काश्मिरात राष्ट्रध्वज फडकावतात. - या कलमातील हस्तक्षेप अजिबात स्वीकारला जाणार नाही, अशा खेळ्या करून तुम्ही भारताचा स्वीकार करणा-या शक्तींनाच कमजोर करीत आहात. ‘वुई द सिटिझन्स’ नावाच्या एका स्वयंसेवी संघटनेने घटनेतील 35 (अ) कलमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हे कलम संसदेसमोर मांडण्यातच आलेले नाही. राष्ट्रपतींच्या आदेशाने त्याची अंमलबजावणी करण्यात आली, त्यामुळे ते रद्द करण्यात यावे, अशी विनंती याचिकेत आहे.

‘पीओके’मध्ये विधानसभा अधिवेशनमेहबूबा म्हणाल्या की, आमच्या विधानसभेत तिकडच्या काश्मीरसाठी (पाकव्याप्त) काही जागा राखीव आहेत. या जागांवर नेमणुका व्हायला हव्यात. आपल्या विधानसभेचे वर्षातील एक अधिवेशन या काश्मिरात (भारतातील काश्मिरात) आणि एकदा त्या काश्मिरात (पाकिस्तानातील) व्हायला हवे. त्यामुळे आपण पर्यटन, प्रवास खुले करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा करू शकू.

Last time I was stopped at the airport itself, and I unfurled the flag there. But I will make sure I do it this time at Lal Chowk: Tanzeem pic.twitter.com/blxhEjKH6z— ANI (@ANI_news) August 4, 2017