AI Shashi Tharoor Interview: गेल्या काही दिवसांपासून अभिनेते किंवा राजकारण्यांचे डीपफेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होण्याच्या घटना घडल्या आहेत. पण, आता चक्क सेलिब्रिटींचे AI व्हर्जन स्वतःची मुलाखत घेत आहेत. तिरुवनंतपुरममधील मातृभूमी आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवादरम्यान अशीच एक घटना पाहायला मिळाली. काँग्रेस खासदार शशी थरुर यांची त्यांच्याच AI अवतारने मुलाखत घेतली. हे पाहून वास्तव आणि तंत्रज्ञान, यातील अंतर किती कमी होत चालले आहे, याची प्रचिती येईल.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, खासदार शशी थरुर यांचा AI अवतार, खऱ्या थरुर यांचे हावभाव आणि भाषेची पूर्णपणे नक्कल करत आहे. पहिल्यांदा पाहिल्यानंतर तुम्हालाही खरे शशी थरुर ओळखता येणार नाहीत. यावेळी मातृभूमी इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल आणि डीपफेक्ससह अनेक मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली.
काँग्रेस खासदाराने ही मुलाखत X (पूर्वी ट्विटर) वर शेअर केली आहे. थरुर यांनी यासोबत लिहिले की, मी माझ्या AI जनरेटेड अवताराशी बोललो. डाव्या बाजूची व्यक्ती डीपफेक आहे. हा अनुभव चकीत करणारा होता. या मुलाखतीत AI अवताराने थरूर यांना डिजिटल प्लॅटफॉर्म्सबद्दल विचारले. ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.