नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मिरप्रश्नी मध्यस्थीच्या केलेल्या दाव्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज जोरदार गोंधळ झाला. दरम्यान, राज्यसभेमध्ये अशी एक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण सभागृह भावूक झाले. त्याचे झाले असे की आज राज्यसभेमध्ये काही खासदारांच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस होता. त्यानिमित्त देण्यात येणाऱ्या निरोपाच्या भाषणादरम्यान एआयएडीएमकेचे खासदार वासुदेवन मैत्रेयन गहिवरले आणि यांच्या डोळ्यात पाणी आले. आपले निधन झाल्यानंतर सभागृहाने शोक पाळू नये असेही, आवाहन त्यांनी केले. त्यामुळे सभागृहातील वातावरणही भावूक झाले. एआयएडीएमकेचे खासदार वासुदेवन मैत्रेयन हे जेव्हा आपल्या निरोपाच्या भाषणासाठी उभे राहिले. तेव्हा त्यांनी आपल्या 14 वर्षांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेतला. त्यानंतर ते भावूक झाले आणि सभागृहामध्येच त्यांना रडू कोसळले. यादरम्यान, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानले. तसेच निकटचे मित्र अरुण जेटली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही त्यांनी आभार मानले.
VIDEO : म्हणून राज्यसभेत ढसाढसा रडले हे खासदार महोदय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 3:53 PM