शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
2
बारामतीच्या दोन मुलींना हडपसरमध्ये दारु पाजली, मित्राच्या खोलीत चौघांकडून सामुहिक बलात्कार
3
हे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाहीत; वन नेशन, वन इलेक्शनवरून संजय राऊतांचा मोदींना टोला
4
Vidhan Sabha Election: मुंबईतील 'या' सहा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा?
5
UNGA : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान! 
6
MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय?
7
"मी कचरा करणार नाही", मराठी बोलताना अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, मागितली माफी, म्हणाले...
8
रक्ताच्या थारोळ्यात पडला होता भाजपा नेता; पोलिसाने लुटली सोन्याची चेन, ४ अंगठ्या, २ मोबाईल
9
पिता-पुत्रांचा षडाष्टक योग: ८ राशींना संमिश्र, अखंड सावध राहावे; सूर्य-शनीची वक्र दृष्टी!
10
रिकाम्या सीटवर बसण्याठी धावला अन् रेल्वेतून खाली पडला; सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू
11
Bajaj Housing Finance Ltd: लिस्टिंगच्या ३ दिवसांत १७०% चा नफा; आता 'हा' शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१५६ वर आला भाव
12
महायुती अन् महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी 'महाशक्ती'; विधानसभेत तिहेरी सामना?
13
Sanjay Roy : "२ दिवसांनी संजय रॉयचे कपडे..."; CBI ने केला पोलिसांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप
14
Who is Hasan Mahmud : कोण आहे हसन महमूद? ज्याच्यासमोर टीम इंडियाचे ३ शेर झाले ढेर
15
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेनंतर सरकार १००० कोटींचे 'हे' काम करणार!
16
Andheri Lokhandwala Fire: अंधेरीत लोखंडवाला येथे भीषण आग, दोन बंगले जळून खाक
17
रेल्वे स्थानकांवरही सुरू होणार एक्झिक्युटिव्ह लाउंज, फक्त दोन रुपयांत मिळू शकते एंट्री!
18
लिस्ट होताच IPO प्राईजच्या खाली आला शेअर; विकण्यासाठी रांग, ₹८२ वर आला भाव, पहिल्याच दिवशी... 
19
दिव्या भारतीच्या निधनाच्या ३१ वर्षांनंतरही कोणतीच अभिनेत्री तोडू शकली नाही तिचा हा रेकॉर्ड
20
Pitru Paksha 2024: पितृ पक्षात मिळणारे शुभ संकेत 'असे' ओळखा आणि भविष्याची आखणी करा!

जोशीमठ बाधितांना दीड लाखांची मदत; स्थानिकांचे मन वळविण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 7:42 AM

बाधित नागरिक पाडापाडी सुरू होण्यापूर्वी बद्रीनाथच्या धर्तीवर नुकसान भरपाईची मागणी करत आहेत.

डेहराडून : उत्तराखंडमधील जोशीमठ येथील दोन आलिशान हॉटेल्स पाडण्यास विरोध करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांचे आणि स्थानिकांचे मन वळवण्यासाठी बुधवारी प्रशासनाकडून नव्याने प्रयत्न करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या सचिव मीनाक्षी सुंदरम आणि आंदोलक यांच्यात चर्चेची एक नवीन फेरी पार पडली. 

बाधित नागरिक पाडापाडी सुरू होण्यापूर्वी बद्रीनाथच्या धर्तीवर नुकसान भरपाईची मागणी करत आहेत. ‘मलारी इन’ आणि ‘माउंट व्ह्यू’ ही हॉटेल्स धोकादायकपणे एकमेकांकडे झुकत आहेत, ज्यामुळे इमारतींच्या आजूबाजूच्या मानवी वसाहतींना धोका निर्माण झाला आहे. उत्तराखंड सरकारने सोमवारी या दोन इमारतींपासून सुरुवात करून अस्थिर संरचना पाडण्याचे निर्देश दिले होते.

सरकारी भरपाईवर नाखूश

जमीन खचण्यामुळे घरांचे नुकसान झालेल्यांना राज्य सरकारने दीड लाख रुपयांची भरपाई दिली असून, ती लोकांनी फेटाळली आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री पुष्कर धामी हे स्थानिक लोकांना सुरक्षेचा विश्वास दर्शविण्यासाठी व प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी रात्रभर जोशीमठमध्ये तळ ठोकून होते.

घटना का घडली?

सुमारे १२ वर्षांपूर्वीच्या एक जलविद्युत प्रकल्पासाठी जमिनीत बोगदा तयार करताना एक मोठी टनल बोरिंग मशीन जोशीमठजवळ अचानक फसली. जमिनीत साचलेले पाणी यावेळी वाहू लागले. अनेक महिने उलटले तरी पाणी थांबले नाही. पाणी वाहून गेल्यामुळे पर्वत पोकळ झाला. आता जोशीमठ खचण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही, असे पद्म पुरस्काराने सन्मानित पर्यावरणतज्ज्ञ डॉ. अनिल पी. जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड