- नितिन अग्रवालनवी दिल्ली : सरकार एड्स नियंत्रण कार्यक्रमावर दरवर्षी करोडो रुपये खर्च करीत असले तरी या आजाराने दर तासाला सहा जणांचा मृत्यू होतो, ही वस्तुस्थिती आहे. देशात एड्सचे १२ लाख ५0 हजार रुग्ण असून, त्यापैकी ७0 रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश या पाच राज्यांत आहेत. तरीही एड्सवर नियंत्रण आणल्याचा दावा सरकार करीत आहे.आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत सर्वाधिक म्हणजे २५२९ एड्सग्रस्तांचा मृत्यू झाला.गेल्या चार वर्षात या रोगाने २६ हजारांहून अधिक लोक मरण पावले आहेत. एड्सवरील औषधे सरकारतर्फे मोफत दिली जातात. गेल्या चार वर्षांत औषधांवर सरकारचे ५५७५ कोटी रुपये खर्च झाले. तरतूद ६८८२ कोटींची करण्यात आली होती. देशात मेफत अँटी रेट्रो व्हायरल थेरपी देणारी ५३६ केंद्रे व ११0८ उपकेंद्रे आहेत.प्रमाण कमी झाल्याचा दावा \मात्र केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी एड्सवर नियंत्रण आणण्यात सरकारला चांगले यश आल्याचा दावा केला. ते म्हणाले की २000 साली २.५१ लाख एचआयव्ही रुग्ण आढळले होते. मात्र २0१५ साली तसे केवळ ८६ हजार रुग्ण आढळले. एड्सचे प्रमाण भारतात ६६ टक्क्याने कमी झाले असून, जागतिक पातळीवर कमी होण्याचे प्रमाण केवळ ३५ टक्के आहे.
सरकार एड्स नियंत्रण कार्यक्रमावर दरवर्षी करोडो रुपये खर्च करीत असले तरी या आजाराने दर तासाला सहा जणांचा मृत्यू होतो, ही वस्तुस्थिती आहे. देशात एड्सचे १२ लाख ५0 हजार रुग्ण असून, त्यापैकी ७0 रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश या पाच राज्यांत आहेत.