नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि त्यातील अधिकांश लोकांना बेड उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात एम्स दिल्लीचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी म्हटले आहे, की कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट आला, की संबंधित रुग्ण पॅनिक होतो आणि त्याच्या मनात येते, की मला नंतर ऑक्सीजन आणि रुग्णालयात भरती होण्याची गरज पडू नये, यामुळे मी आताच भरती होतो. परिणामी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी होती आणि ज्यांना उपचारांची खरोखरच गरज आहे, त्यांना उपचार मिळत नाही. (AIIMS delhi director randeep guleria said about corona patients and need of hospitalization in india)
पॅनिक झाल्यानेच लोक स्टोअर करतायत औषधी -डॉ. गुलेरिया म्हणाले, या पॅनिकमुळेच लोक घरी औषधीही स्टोअर करतात. यामुळे विनाकारणच बाजारात औषधांची कमतरता भासते. अनेकांना वाटते, की कोरोना आहे, तर मी पहिल्याच दिवसांपासून सर्व औषधे सुरू करतो, यामुळे अधिक साइड इफेक्ट्स होतात.
कोरोनाच्या उपचारात ऑक्सिजन महत्वाचा -डॉ. गुलेरिया यांनी सांगितले, लोक आधीपासूनच ऑक्सिजन सिलेंडर घरी ठेवतात. त्यांना वाटते, की भविष्यात याची गरज पडली तर परेशानी होणार नाही. ही धारणा चुकीची आहे. गुलेरिया म्हणाले, कोरोनाच्या उपचारात ऑक्सिजन एक महत्वपूर्ण रणनीती आहे. मात्र, त्याचा दुरूपयोग होतानाही दिसत आहे. ऑक्सिजन सॅच्युरेशनवर बोलायचे, तर आज सर्वच जण ऑक्सिमीटरच्या माध्यमाने ते बघत आहेत. ते जर 90 ते 100 दरम्यान असेल तर त्याला घाबरण्याची गरज नाही.
धक्कादायक! कोरोना संक्रमित वडिलांना रस्त्यातच सोडून पळाला मुलगा, मदतीसाठी ओरडत राहिली पत्नी; पण...
काही लक्षणे दिसत असतील तर स्वतःला घरातच करा आयसोलेट -एम्स डायरेक्टर म्हणाले, आपल्याला कोरोनाची काही लक्षणं दिसत असतील तर स्वतःला घरातच आयसोलेट करा आणि रिपोर्ट येण्याची वाट पाहा. अनेक वेळा RT-PCR टेस्ट नेगेटिव्हदेखील येऊ शकते. कारण त्याची संवेदनशिलता 100% नाही. अशा स्थितीतही आपण ग्रुहित धरायला हवे, की आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यावर उपचार घ्यायला हवेत.