नवी दिल्ली: अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अद्यापपर्यंत सीबीआयच्या हाती फारसं काही लागलेलं नाही. सुशांतची हत्या झाली हे सिद्ध करणारा एकही पुरावा सीबीआयला सापडलेला नाही. मात्र आता सुशांतच्या विसराची तपासणी करणाऱ्या एम्सच्या डॉक्टरांना काही महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. सुशांतच्या विसरामध्ये डॉक्टरांना काही केमिकलचे अंश आढळून आले आहेत. मात्र अद्याप डॉक्टरांकडून सुरू असलेली तपासणी पूर्ण झालेली नाही.सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक एम्समधील डॉक्टरांना सुशांतच्या विसराच्या तपासणीतून महत्त्वाच्या गोष्टी हाती लागल्या आहेत. पोटाचा भाग, छोटं आतडं, यकृताचा एक तृतीयांश भाग, पित्ताशय, दोन्ही किडण्यांचा काही भाग, १० मिली रक्त आणि डोक्यावरील केसांचं निरीक्षण डॉक्टरांकडून करण्यात आलं. यामध्ये डॉक्टरांना काही प्रमाणात केमिकलचे अंश सापडले. सुशांतच्या मृत्यूसाठी हे केमिकलचे अंश कारणीभूत होते का, याचा शोध सीबीआयच्या टीमकडून घेतला जाईल. त्यामुळे आता सीबीआयचा तपास महत्त्वाच्या टप्प्यात येण्याची शक्यता आहे.सुशांत घाबरायचा, म्हणून मित्रांजवळ ड्रग्ज ठेवायचा...! रिया चक्रवर्तीचा NCB समोर मोठा खुलासाएम्सची फॉरेन्सिक टीम विसरा तपासणीतून समोर आलेल्या निरीक्षणांची आणि निष्कर्षांची माहिती सीबीआयला देईल. त्यांना केमिकलच्या अंशांची पूर्ण माहिती दिली जाईल. त्यानंतर सीबीआयची टीम या केमिकलचा संबंध सुशांतच्या मृत्यूशी आहे का, याचा शोध घेण्यास सुरुवात करेल. सुशांतच्या शरीरात सापडलेल्या केमिकलचा संबंध हत्या करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विषाशी नसल्याचं एम्सच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.सारा अली खानसोबत सुशांतने पहिल्यांदा घेतला होता ड्रग्सचा हेवी डोस, रियाचा NCBसमोर खुलासा डॉक्टरांकडून करण्यात आलेली तपासणी सुरूच असल्यानं वैद्यकीय बोर्डाची बैठकही झालेली नाही. एमच्या मेडिकल बोर्डाची बैठक या आठवड्यात होऊ शकते. त्यात विसरा तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचं पथक आपले निष्कर्ष मांडतील. यानंतर याचा सविस्तर अहवाल सीबीआयला सोपवला जाईल. विसरा तपासणीचं काम डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील पथक करत आहे. गुप्ता हे फॉरेन्सिकमधील तज्ज्ञ आहेत.
सुशांतच्या विसरा रिपोर्टमधून महत्त्वाची माहिती समोर; तपासाला मिळणार वेगळं वळण?
By कुणाल गवाणकर | Published: September 21, 2020 5:50 PM