शिवसेना (उद्धव ठाकरे गट)नेते संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबासोबत केली. गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले, त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येत आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांना औरंगजेब म्हणा, असे वादग्रस्त वक्तव्य राऊत यांनी केले होते. यानंतर आता ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादूल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
ओवेसी म्हणाले, "गांधींना मारणाऱ्यांचा जन्म कोठे झाले होता? गोडसे कोठे जन्माला आला होता? मुंबईच्या रस्त्यांवर दंगली झाल्या होत्य, यात हिंदू-मुस्लीम मारले गेले होते. ते कोठे जन्माला आले होते? भिवंडीमध्ये जी दंगल झाली होती, ती दंगल घडवून आणणारे कोठे जन्माला आले होते? या सर्वांचा विचार करावा लागेल. आम्ही तर आग विझवणारे आहोत."
ओवेसी म्हणाले, संजय राऊत 2014 मध्ये काही वेगळेच बोलत होते. तेव्हा ते मोदींना हिंदू ह्रदय सम्राट म्हणत होते. पम आता काय म्हणत आहेत. मी काही बादशाह अथवा मुगलांचा प्रवक्त नाही. आता कुणीही पाजा नाही. संविधानानंतर सर्व समान झाले आहेत.
काय म्हणाले संजय राऊत? -संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्र यासाठी मोठा आहे, कारण या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, यामुळे या महाराष्ट्राला इतिहास आहे. आणि आज जे महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत. ते गुजरातचे राज्यकर्ते मोदी असतील किंवा शाह असतील. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले, त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येत आहे. शिवसेनेच्या विरोधात आणि आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात." यावेळी, समोरील कार्यकर्त्यांमधून एकेरी नावाने 'मोदी आला मोदी, अशी हाक आली. यावर, मोदी आला नाही, 'औरंगजेब आला म्हणा', असे राऊतांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींचा पलटवार -पंतप्रधान मोदी म्हणाले, "आम्ही पुढील 25 वर्षांचा रोडमॅप तयार करत आहोत आणि आपल्या तिसऱ्या टर्मच्या पहिल्या 100 दिवसांचा प्लॅनही तयार करत आहोत. दुसऱ्या बाजूला आमचे विरोधकही नवे विक्रम निर्माण करत आहेत. त्यांनी आजच मोदींना 104वी शिवी दिली आहे. औरंगजेब म्हणत गौरवण्यात आले आहे. माझी खोपडी उडवण्याचे आवाहन करण्यात आले आहे."
विरोधकांवर मोदींचा निशाणा - पंतप्रधान मोदी म्हणाले, आज गरीब मला आशीर्वाद देत असताना, वोरोधकांच्या मनात शिव्या येत आहेत. हे लोक आज त्या गरिबांनाही शिव्या देत आहेत आणि मलाही. मात्र, त्या शिव्यांनी मला काही फरक पडणार नाही. कारण लोक आमच्यासोबत आहेत.