शिव सेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारण पार ढवळून निघाले आहे. यावर विविध पक्षांचे नेतेही प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. यातच आता, AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्रातील राजकीय संकट (Maharashtra political crisis) म्हणजे माकडांचा डान्स असल्याचे म्हटले आहे. तसेच, यासंदर्भात महाविकास आघाडीला विचार करून द्या. आम्ही संपूर्ण नाट्यावर लक्ष ठेवून आहोत, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेनेच्या ३७ आमदारांनी बंडखोर केली आहे. बंडखोर आमदारांचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. सध्या हे बंडखोर आमदार आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत.
आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेले असदुद्दीन ओवेसी महाराष्ट्रातील राजकीय संकटावर बोलताना म्हणाले, 'महाविकास अघाडीला या प्रकरणावर विचार करू द्या. आम्ही समोर येणाऱ्या नाट्यावर लक्ष ठेऊन आहोत. हा माकडांचा डान्स दिसत आहे. एका फांदीहून दुसऱ्या फांदीवर उड्या मारणाऱ्या माकडांप्रमाणे सर्व सुरू आहे.'
बाळासाहेब ठाकरे हा एक विचार, खाजगी मालमत्ता असू शकत नाही -मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून, शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हा एक विचार आहे आणि विचार हा कुठल्या पक्षाची किंव्हा व्यक्तीची खाजगी मालमत्ता असू शकत नाही. जेव्हा महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक करायचे होते तेव्हा बाळासाहेब पूर्ण हिंदुस्थानचे होते. आता म्हणता फक्त तुमचेच असे कसे, अशी विचारणा संदीप देशपांडे यांनी केली आहे.