पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका (UP Assembly Election 2022) पार पडणार आहेत. दरम्यान, आता राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एमआयएमनं (AIMIM) निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी यासंदर्भात घोषणा केली. तसंच या निवडणुकांमध्ये १०० उमेदवार उभे करणार आहे.
"उत्तर प्रदेशा निवडणुकांबाबत काही गोष्टी तुमच्यासमोर ठेवू इच्छित आहे. आम्ही विधानसभेच्या १०० जागांवर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षानं उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि आम्ही उमेदवारांचे अर्ज पत्रही जारी केलं आहे," असं ओवेसी म्हणाले. त्यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली.