मनिला : एअर आशिया जेस्ट कंपनीचे विमान फिलिपाईन्सच्या मध्य प्रांतात जोरदार वादळामुळे धावपट्टीवरून घसरले. सर्व १५९ प्रवासी आणि पायलटसह कर्मचारी सुखरूप आहेत. हे विमान मनिलाहून आले होते, अशी माहिती विमानतळावरील सूत्राने दिली.एअर आशिया जेस्टचे अधिकारी जियोवनी होंतोमिन यांनी सांगितले की पायलटने एअरबस ए ३२०.२०० तील प्रवाशांना सुरक्षितपणे उतरविण्यासाठी विमानाच्या एका इमर्जन्सी स्लाईडला सक्रिय केले होते. कोणालाही काही इजा झाल्याचे सध्या तरी वृत्त नाही व विमान अजूनही धावपट्टी संपते तेथील गवताळ भागात अडकून पडलेले आहे. एअर आशियाचे विमान रविवारी जावा समुद्रावरून बेपत्ता झाले व समुद्रात कोसळल्यानंतरची ही ताजी घटना आहे.विमान अपघातात ६ ठारयुकावू : डेमोक्रॅटिक रिपब्लिक आॅफ कांगोच्या पूर्व भागातील युविरा डोंगरांत सोमवारी झालेल्या विमान अपघातात ६ जण ठार झाले. विमान युगांडाहून कांगोतील पोंटे नोरेकडे जात होते. ही दुर्घटना कशामुळे घडली हे लगेचच समजू शकले नाही. (वृत्तसंस्था)
एअर आशियाचे विमान धावपट्टीवरून घसरले
By admin | Published: December 30, 2014 11:38 PM