नवी दिल्ली- भारतीय हवाई दल चीन आणि पाकिस्तानबरोबर एकत्रित दोन हात करण्यासाठी तयार आहे, असे संकेत हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोवा यांनी दिले आहेत. हवाई दलाच्या 13 दिवसांच्या युद्धाभ्यासा(गगनशक्ती)नं निश्चित उद्दिष्ट्यांहून चांगले परिणाम मिळवले आहेत. हवाई दलाच्या तीन दशकातील हा युद्धाभ्यास 20 एप्रिलला संपन्न झाला.लढाऊ विमान, रोटरी विंग विमानांनी 11 हजारांहून जास्त वेळा उड्डाण करून युद्धासाठीच्या स्वतःच्या क्षमतेचं परीक्षण केलं आहे. 8 एप्रिलपासून 20 एप्रिलपर्यंत सुरू असलेल्या या युद्धाभ्यासात ब्रह्मोस आणि हार्पून अशा क्षेपणास्त्रांसह सुखोई आणि जग्वार सारख्या विमानांनी सहभाग नोंदवत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. आम्ही 48 तासांच्या आताच शस्त्रास्त्र आणि साधनांना एका भागातून दुस-या भागात नेण्याचं लक्ष्य पूर्ण केलं आहे, असंही बी. एस. धनोवा म्हणाले आहेत.हवाई दलानं गगनशक्ती युद्धसरावादरम्यान वाळवंट, लद्दाखसारखी उंच ठिकाणं, समुद्रात सराव केला आहे. हवाई दलाच्या अधिका-यांनी युद्धसरावादरम्यान मलाक्क्याची सामुद्रधुनी हल्ला केल्याच्या बातमीचं खंडन केलं आहे. परंतु हवाई दलानं 4000 किलोमीटर दूरवर असलेल्या मलाक्क्याची सामुद्रधुनीला लक्ष्य करण्याची क्षमता प्राप्त केल्याही माहिती वायुसेना प्रमुखांनी दिली आहे. नौदलानं दिलेल्या ठिकाणांनाच आम्ही टार्गेट केलं आहे. त्यात मलेशिया, सिंगापूर आणि इंडोनेशियाच्या समुद्री मार्गांचा समावेश नाही. याच वेळी हवाई दलानं नौदलाबरोबर संयुक्तरीत्या समुद्री आणि हवाई ऑपरेशनचा अभ्यास केला आहे. चीन हिंदी महासागरात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय हवाई दलाला युद्धसरावात मिळालेलं यश हा चीनसाठी एक प्रकारचा इशाराच आहे
चीन-पाकशी एकत्र निपटण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज- बी. एस. धनोवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 8:31 AM