शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

भारत पुन्हा करणार बालाकोट उद्ध्वस्त करणाऱ्या 'त्या' बॉम्बची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 1:40 PM

इस्राईलकडून भारत पुन्हा बॉम्बची खरेदी करणार

नवी दिल्ली: हवाई दलानं एअर स्ट्राइकदरम्यान वापरलेल्या स्पाईस 2000 बॉम्बची पुन्हा एकदा इस्राईलकडून खरेदी करण्यात येणार आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून 26 फेब्रुवारीला भारतीय हवाई दलानं बालाकोटमधल्या दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. त्यावेळी हवाई दलानं स्पाईस 2000 बॉम्बचा वापर केला होता. या बॉम्बनं अचूक निशाणा साधत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. ताफ्यातील शस्त्र आणखी अत्याधुनिक करण्यासाठी हवाई दलाकडून स्पाईस 2000 बॉम्बची खरेदी करण्यात येणार आहे. कोणत्याही इमारतीला उद्ध्वस्त करण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीनं या बॉम्बचा वापर करता येतो. या बॉम्बच्या आधीच्या व्हर्जनमध्ये इमारतीला भेदण्याची आणि त्यानंतर इमारतीत स्फोट घडवण्याची क्षमता होती. बालाकोटच्या एअर स्ट्राईकमध्ये स्पाईस 2000 बॉम्बनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त करण्याची कामगिरी स्पाईस 2000 नं यशस्वीरित्या पार पाडली होती. 26 फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज 2000 विमानांनी बालाकोटवर हल्ला चढवला. त्यावेळी विमानांनी स्पाईस 2000 बॉम्ब दहशतवादी तळांवर टाकले. या बॉम्बनं बालाकोटमधील दहशतवाद्यांची प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी इमारत उद्ध्वस्त केली. स्पाईट 2000 नं दहशतवाद्यांच्या इमारतीला भगदाड पाडलं. त्यानंतर तिथे मोठा स्फोट झाला. हवाई दलानं केलेली ही कामगिरी पूर्णपणे यशस्वी झाल्याचं हवाई दल प्रमुखांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलIsraelइस्रायलpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला