नवी दिल्ली: भारतीय वायुसेनेचे(IAF) Mi-17 हेलिकॉप्टर गुरुवारी अरुणाचल प्रदेशच्या पूर्व भागात कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात विमानातील 2 पायलट आणि 3 क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर देखभालीसाठी वापरण्यात येत होते. दरम्यान, या अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले जातील.
यापूर्वीही सप्टेंबरमध्ये जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील शिवगड धार भागात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले होते, ज्यामध्ये दोन पायलट ठार झाले होते. ऑगस्टमध्येही जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात रणजीत सागर धरणाजवळ हेलिकॉप्टर अपघातात दोन पायलट ठार झाले होते. 21 ऑक्टोबरलाही मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात भारतीय वायुसेनेचे लडाऊ विमान मिराज-2000 कोसळले होते. क्रॅश होण्यापूर्वी पायलटने पॅराशूट घेऊन उडी मारल्याने तो या अपघातात वाचला होता. दैनंदीन ट्रेनिंगदरम्यान हा अपघात झाला होता.
2017 मध्ये हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये 7 जवान शहीद2017 मध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये Mi-17-V5 हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. त्या अपघातात 7 जवान शहीद झाले होते. अपघाताचा व्हिडिओही समोर आला होता. 6 ऑक्टोबर 2017 रोजी, भारतीय वायुसेनेचे एक Mi-17-V5 हेलिकॉप्टर आपल्या नियमित मोहिमेवर उड्डाण करत असताना हेलिकॉप्टरला अपघात झाला होता.