शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
5
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
6
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
7
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
8
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
9
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
10
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
11
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
12
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
13
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
14
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
15
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
16
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
17
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
18
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
19
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
20
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती

"मी प्रयत्न केला, पण..."; वायुसेनेच्या अधिकाऱ्याने सांगितला दिल्ली स्टेशनवरचा धक्कादायक प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 14:01 IST

चेंगराचेंगरीच्या वेळी स्थानकावर उपस्थित असलेल्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याने घडलेला प्रसंग सांगितला.

New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी प्रवाशांची रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. त्यादरम्यान एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी धावपळ सुरु झाली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीच्या वेळी स्थानकावर असलेल्या हवाई दलाच्या अधिकाऱ्यानेही घडलेला प्रसंग सांगितला. कोणीही ऐकत नव्हते, असं  हवाई दलाच्या अधिकाऱ्याने म्हटलं.

नवी दिल्ली स्टेशनवर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांना आपला जीव गमवावा लागला. महाकुंभ स्नानासाठी हजारो भाविक प्रयागराज येथे जात असताना रात्री दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडलाी. स्टेशनवर प्रचंड गर्दी जमल्याने चेंगराचेंगरी होऊन १८ जणांना जीव गमवावा लागला. या अपघाताचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सतत घोषणा करूनही लोक ऐकायला तयार नव्हते.

"रेल्वे स्टेशनवर तिन्ही दलांची कार्यालये आहेत. मी ड्युटीवरून परतत असताना स्टेशनवर प्रचंड गर्दी असल्याने मलाही जाता आले नाही. मी लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि सतत घोषणा होत होत्या ज्यात लोकांना स्टेशनवर एका ठिकाणी एकत्र न येण्याचे आवाहन केले जात होते, पण लोक ऐकत नव्हते. प्रशासनाने अपघात थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही ऐकत नव्हते. मी आणि माझ्या एका मित्रानेही जखमींना मदत केली," असं अजित यांनी सांगितले.

रेल्वे स्टेशनवर मर्यादेपेक्षा जास्त गर्दी होती असे हवाई दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. फूटओव्हर ब्रिजवर लोकांची गर्दी होती. रेल्वे स्टेशनवर इतकी गर्दी मी कधीच पाहिली नाही. सणासुदीच्या काळातही फारशी गर्दी नसते. जमाव एवढा मोठा होता की त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते, असेही हवाई दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

आणखी एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन येण्याचा प्लॅटफॉर्म बदलण्यात आला आणि घोषणा होताच चेंगराचेंगरी झाली. गर्दीवर नियंत्रण ठेवणारे कोणी नव्हते. प्लॅटफॉर्म क्रमांक १२ वर येणारी गाडी प्लॅटफॉर्म १६ वर येणार असल्याची घोषणा होताच दोन्ही बाजूंनी प्लॅटफॉर्मवर जमाव जमला, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

दुसरीकडे, रेल्वेचा प्लॅटफॉर्म बदलला गेला नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती चौकशी करण्यात येत आहे. पण एकही ट्रेन रद्द करण्यात आली नाही किंवा कोणत्याही ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलला नाही. आता प्लॅटफॉर्मवर परिस्थिती सामान्य आहे. सर्व गाड्या त्यांच्या नेहमीच्या वेळेनुसार धावत आहेत, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, उत्तर रेल्वेचे सीपीआरओ हिमांशू शेखर उपाध्याय  यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'काल ही दुःखद घटना घडली तेव्हा पाटण्याकडे जाणारी मगध एक्सप्रेस नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर उभी होती आणि जम्मूच्या दिशेने जाणारी उत्तर संपर्क क्रांती प्लॅटफॉर्म क्रमांक १५ वर उभी होती. फूट ओव्हर ब्रिजवरून फलाट क्रमांक १४-१५ कडे जाणाऱ्या पायऱ्यांवर एक प्रवासी घसरून पडल्याने त्याच्या पाठीमागे उभ्या असलेल्या अनेक प्रवाशांना धक्का बसला आणि ही चेंगराचेंगरी झाली.

टॅग्स :New Delhi Railway Station Stampedeनवी दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरीdelhiदिल्लीAccidentअपघातIndian Railwayभारतीय रेल्वे