Tejas Aircraft: भारतीय सशस्त्र दलांची ताकद आणखी वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैन्याची लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी 97 तेजस लढाऊ विमाने आणि सुमारे 150 प्रचंड हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण संपादन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय झाला.
आज संरक्षण मंत्रालयाने भारतीय हवाई दलासाठी सुमारे 65,000 कोटी रुपये खर्चून 97 LCA मार्क 1A लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याशिवाय, 156 एलसीएच प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी आणि 84 Su-30MKI लढाऊ विमानांच्या अपग्रेड योजनेलाही संरक्षण अधिग्रहण परिषदेने मंजुरी दिली आहे. या प्रस्तावावर सूमारे 1.6 लाख कोटी रुपय खर्च अपेक्षित आहे.