शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

विमानात प्रवाशाने महिलेवर केली लघवी; पीडितेने थेट टाटा ग्रुपच्या चेअरमनकडे केली तक्रार, नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 5:08 PM

एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने दारुच्या नशेत वृद्ध महिलेवर लघवी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नवी दिल्ली: एअर इंडियाच्याविमानातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलेवर लघवी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटना गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरची आहे, या घटनेवर विमान कंपनीने कोणतीही कारवाई केली नाही. यानंतर वृद्ध महिलेने टाटा समूहाच्या अध्यक्षांकडे तक्रार केली, त्यानंतर विमान कंपनीचे अधिकारी सक्रिय झाले आणि त्यांनी दिल्ली पोलिसांकडे FIR दाखल केला आणि तपास पूर्ण होईपर्यंत आरोपीला विमान प्रवास करण्यास बंदी घातली.

आरोपी प्रवाशावर 30 दिवसांची बंदीएअर इंडियाने 28 डिसेंबर रोजी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले की, न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमान दिल्लीला येत होते. यावेळी एका प्रवाशाने दारुच्या नशेत बिझनेस क्लासमध्ये बसलेल्या एका वृद्ध महिलेवर लघवी केली. या घटनेनंतर, एअर इंडियाने एक अंतर्गत समिती स्थापन केली आणि त्यांनी आरोपी प्रवाशाला नो-फ्लाय लिस्टमध्ये ठेवण्याची शिफारस केली. तसेच, प्रवाशाला 30 दिवस प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दोषी आढळल्यास पुढील कारवाई केली जाईल.

नशेत इतके होता की...रिपोर्ट्सनुसार, दुपारच्या जेवणानंतर विमानातील प्रकाश कमी झाला होता, यावेळी नशेत असलेल्या व्यक्तीने महिलेच्या अंगावर लघवी केली. यावेळी सहप्रवाशांनी त्याला पाहिले आणि हटकले. दुसरीकडे, महिलेने क्रूला सांगितले की तिचे कपडे, शूज आणि बॅग लघवीने भिजली आहे, त्यानंतर क्रू मेंबरने तिला कपडे आणि चप्पल दिली आणि तिला तिच्या सीटवर परत येण्यास सांगितले. विमान दिल्लीत उतरल्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. यावेळी क्रू मेंबर्स किंवा विमान कंपनीने कोणतीही कारवाई केली नाही.

महिलेने टाटा समूहाला पत्र लिहिलेटाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अनेक दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे पीडित महिलेने थेट टाटा समूहाचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांना पत्र लिहिले. त्या महिलेने पत्रात त्या दिवशी घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर घटना उघडकीस आली आणि अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशावर कारवाई केली. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर एव्हिएशन रेग्युलेटर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने (डीजीसीए) विमान कंपनीकडून घटनेचा अहवाल मागवला आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाWomenमहिलाairplaneविमानTataटाटा