शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

Air India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2020 9:51 PM

Air India Express Accident: एअर इंडियाच्या विमानाला करीपूर विमानतळावर भीषण अपघात

कोझिकोड: केरळच्या कोझिकोडमधील करीपूर विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेस विमानाला अपघात झाला आहे. दुबईवरून केरळमधल्या करीपूर विमानतळावर लँडिंग होत असताना विमान धावपट्टीवर घसरलं. या विमानात 180हून अधिक प्रवासी होते. संध्याकाळी 7:41 वाजता अपघात झाला. एअरलाइन्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धावपट्टीवर विमानानं ओव्हरशॉट केल्याचं दिसून आलं. (Air India Express Accident)केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दुबईहून आलेलं एअर इंडियाचं विमान लँड होत असताना धावपट्टी ओली होती. याशिवाय दृश्यमानतादेखील कमी होती, अशी माहिती नागरी उड्डाण संचलनालयानं (डीजीसीए) दिली. 'एअर इंडिया एक्स्प्रेस विमान दुबईहून कोझिकोडेला येत असताना विमानतळावर उतरल्यानंतर अपघात झाला. करीपूर विमानतळावरील रनवे क्रमांक 10 वर दुर्घटना घडली. यामध्ये विमानाचे दोन तुकडे झाले. विमानात 191 जण होते. विमान लँडिंग करताना दृश्यमानता २ हजार मीटर इतकी होती,' असं डीजीसीएकडून सांगण्यात आलं आहे. डीजीसीएकडून विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.एअर इंडियानं दिलेल्या माहितीनुसार बी७३७ विमानात १८४ प्रवासी होते. त्यामध्ये १० लहान मुलांचा समावेश होता. याशिवाय विमानात २ वैमानिकांसह एकूण ७ कर्मचारी होते. विमान धावपट्टीवरून घसरल्यानं अपघात झाला. अपघातानंतर विमानानं पेट घेतला नाही. प्रवाशांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये नेण्यात आल्याची माहिती एअर इंडियानं दिली आहे. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी गोंधळाचं वातावरण आहे. विमानाच्या पुढच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया