कोरोनामुळे अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना दुबईहून परत घेऊन येणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान शुक्रवारी रात्री मुसळधार पावसात केरळमधील कोळीकोड येथील करीपूर विमानतळावर उतरत असताना त्याचे दोन तुकडे झाले. रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये वैमानिक दीपक साठे यांचाही समावेश आहे. दुर्घटनेत नेमकं काय झालं, याबद्दल दीपक साठे यांचा चुलत भाऊ निलेश साठे यांनी हळवी पोस्ट लिहिली आहे. (Air India Express Accident)
जय महाराष्ट्र!.... उद्धव ठाकरे पुन्हा एकदा देशातील टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये
हे विमान बोर्इंग ७३७ होते व ते ठरल्या वेळी म्हणजे साय. ७.४१ वाजता विमानतळावर उतरले. विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार विमानात १७४ प्रौढ प्रवासी, १० तान्ही मुले, दोन वैमानिक व चार विमान कर्मचारी असे एकूण १९० जण होते. कोळीकोडचे विमानतळ डोंगरमाथ्यावर आहे व त्याच्या धावपट्टीच्या दुतर्फा दरी आहे. सुदैवाने धावपट्टीवरून घसरले तेव्हा विमानाचा वेग बराच कमी झाला होता. अनुभवी वैमानिक दीपक साठे आणि अखिलेश कुमार यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली. पण, या प्रयत्नांत दोघांचाही मृत्यू झाला. (Air India Express Accident)
या आहेत भारतातील सर्वात धोकादायक धावपट्ट्या, विमान उतरताना रोखला जातो श्वास
दीपक साठे यांचे चुलत बंधू निलेश साठे यांनी हळवी फेसबुक पोस्ट लिहिली. यामध्ये त्यांनी मिळालेल्या माहितीनुसार नेमकं काय झालं, हे समजावण्याचा प्रयत्न केला आहे. निलेश साठे यांनी लिहिलं की,''विमानाचे लँडींग गिअर काम करत नव्हते. भारतीय हवाई दलाचे माजी वैमानिक ( दीपक साठे) यांनी विमानतळाच्या तीन फेऱ्या मारून इंधन संपवलं. यामुळे अपघात होऊनही विमानानं पेट घेतला नाही. विमान लँड करण्यासाठी इंजिन बंद करण्यात आले होते. तीनवेळा विमान आदळले. अशा प्रकारे विमानाची मोठी दुर्घटना होऊनही, अनेक प्रवाशांचे जीव वाचवण्यात वैमानिकांना यश आलं.'' (Air India Express Accident)
Its hard to believe that Dipak Sathe, my friend more than my cousin, is no more. He was pilot of Air India Express...
Posted by Nilesh Sathe on Friday, August 7, 2020
शतकी आघाडी घेऊनही पाकिस्तानची हाराकिरी; तिसऱ्या दिवशी पडल्या 14 विकेट्स
बोंबला! डुक्करामुळे तो विवस्त्र धावत सुटला, जाणून घ्या व्हायरल फोटोची गंमत...