Air India Plane Crash : 'हे' आहेत भारतातील आतापर्यंतचे मोठे विमान अपघात, महाराष्ट्रानेही अनुभवलीय दाहकता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 08:38 AM2020-08-08T08:38:33+5:302020-08-08T08:52:21+5:30

Air India Plane Crash in Kerla, Latest News : भारतातील मोठ्या विमान अपघाताविषयी जाणून घेऊया.

Air India Plane Crash major airplane crashes in india | Air India Plane Crash : 'हे' आहेत भारतातील आतापर्यंतचे मोठे विमान अपघात, महाराष्ट्रानेही अनुभवलीय दाहकता

Air India Plane Crash : 'हे' आहेत भारतातील आतापर्यंतचे मोठे विमान अपघात, महाराष्ट्रानेही अनुभवलीय दाहकता

googlenewsNext

तिरुअनंतपूरम - केरळमधील कोझिकोड येथील करीपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला शुक्रवारी (७ ऑगस्ट ) भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.  एअर इंडियाच्या विमानाच्या झालेल्या अपघातात मुख्य वैमानिक दीपक वसंत साठे यांचा मृत्यू झाला. ते अनुभवी वैमानिक होते. विमानतळाच्या धावपट्टीवर साचलेल्या पाण्यामुळे विमानाचे ब्रेक योग्य प्रकारे लागत नाहीत. केरळ येथील हवामान खराब असल्याने तसेच धावपट्टीवर पाणी साचल्याने ब्रेक लागूनही विमान घसरल्याने अपघात झाल्याची शक्यता आहे, असे निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी सांगितले. भारतातील मोठ्या विमान अपघाताविषयी जाणून घेऊया.

भारतातील मोठे विमान अपघात

१९५८ : गुडगावमध्ये (आता गुरुग्राम) विमान अपघातात ४ जणांचा मृत्यू
७ जुलै १९६२ : एलिटालिया फ्लाइट ७७७ मुंबईत पहाडी भागात धडकले. ९४ जणांचा मृत्यू.
२८ जुलै १९६३ : यूएईच्या विमानाचा मुंबईत अपघात : ६३ ठार.
१९ सप्टेंबर १९६५ : सीमेवर पाकिस्तानने भारतीय नागरी विमान पाडले. ८ जणांचा मृत्यू.
१४ जून १९७२ : जपान एअरलाइन्सचे विमान दिल्लीत विमानतळावर कोसळले. ८५ जणांचा मृत्यू.
३१ मे १९७३ : दिल्ली विमानतळावर इंडियन एअरलाइन्सचे विमान कोसळले. ४८ जणांचा मृत्यू.

१२ ऑक्टोबर १९७६ : मुंबईत इंडियन एअरलाइन्सच्या विमानाला आग, ९५ मृत्युमुखी.
१ जानेवारी १९७८ : एअर इंडियाचे विमान मुंबईत बांद्रा किनाऱ्यालगत कोसळले. २१३ जणांचा मृत्यू.
२१ जून १९८२ : मुंबईच्या सहार विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला अपघात. १७ मृत्युमुखी.
१९ ऑक्टोबर १९८८ : इंडियन एअरलाइन्सच्या विमानाला अहमदाबादेत अपघात, १३३ जणांचा मृत्यू.
१४ फेब्रुवारी १९९० : इंडियन एअरलाइन्सचे विमान बंगळुरुत कोसळले. ९२ जणांचा मृत्यू.

१६ जुलै १९९१ : इंफाळमध्ये इंडियन एअरलाइन्सचे विमान कोसळले. सर्व ६९ प्रवाशांचा मृत्यू.
२६ एप्रिल १९९३ : इंडियन एअरलाइन्सचे विमान महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये रनवेवरुन उड्डाणानंतर ट्रकला धडकले. ५५ प्रवाशांचा मृत्यू.
१२ नोव्हेंबर १९९६ : सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या विमानाची कझाकिस्तान एअरलाइन्सच्या विमानाशी हवेत धडक़ ३४९ लोकांचा मृत्यू.
१७ जुलै २००० : पाटण्यात एलायन्स एअर विमानाला अपघात, ६० मृत्युमुखी.
२२ मे २०१० : एअर इंडिया एक्सप्रेस विमान मेंगळुरु एअरपोर्टवर कोसळले. १५८ प्रवाशांचा मृत्यू.

महत्त्वाच्या बातम्या

'हिंदू सत्तेत असतील तरच मंदिरं वाचतील, धर्म सुरक्षित राहील'; भाजपा नेत्याचं विधान

CoronaVirus News : हृदयद्रावक! बालकांना कोरोनामुक्त करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू, ४२ जणांचा वाचवला होता जीव

Sushant Singh Rajput Case: "आदित्यजी चिंता नको, मुंबई पोलीस सक्षम की बिहार? हे शेंबडं पोरगंही सांगेल"

Breaking: रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट जैसे थे; आरबीआयकडून EMI सवलतीवर सस्पेन्स कायम

CoronaVirus News : काय सांगता? रेनकोट समजून चोरलं पीपीई किट अन् झालं असं काही...

Web Title: Air India Plane Crash major airplane crashes in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.