नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौºयांचा तपशील गोपनीय असल्याने देता येणार नाही हा एअर इंडियाचा दावा केंद्रीय माहिती आयुक्त अमिताव भट्टाचार्य यांनी अमान्य केला. याची एअर इंडियाकडे असलेली माहिती त्या कंपनीने सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.मोदी यांनी २०१६-१७ या वर्षात जिथे जिथे दौरे केले ती ठिकाणे, त्या दौºयांपायी झालेल्या खर्चाची पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात आलेली बिले व या दौºयांचा कालावधी यांचा तपशील एअर इंडियाने सादर करावा, असा आदेश देतानाच केंद्रीय माहिती आयुक्तांनी म्हटले आहे की, या विदेश दौºयांचा खर्च हा सरकारी तिजोरीतून केला जातो. त्यामुळे त्याची माहिती सर्वांना कळणे आवश्यक आहे. या प्रकरणी लोकेश बात्रा यांनी माहिती अधिकाराखाली केंद्रीय माहिती आयुक्तांकडे अर्ज दाखल केला होता. भट्टाचार्य यांनी आदेशात म्हटले आहे की, या दौºयांची माहिती जगजाहीर असल्याने ती गोपनीय नाही.
पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यांचा तपशील एअर इंडियाने द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 1:18 AM