ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ९ - एअर इंडियाची आर्थिक परिस्थिती खराब असून तिला सरकारने विकायला, जरी काढल्यास कोणीही घेऊ शकणार नाही, असे नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी गुरुवारी सांगितले. एअर इंडियावर ५०,००० कोटींचे कर्ज असल्याने निर्गुंतवणूक करणे नियमांच्या बाहेर आहे. २००७ मध्ये एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे एकत्रिकरण करण्यात आले, तेव्हापासून एअर इंडिया व्यवसायातील कठीण अटी आणि कर्जातून जात आहे. सध्याची एअर इंडियाची परिस्थिती इतकी आर्थिकदृष्ट्या दयनीय आहे, की एअर इंडियाला विकायला काढले, तरी कोण विकत घेणार नाही, असे अशोक गजपती राजू म्हणाले. तसेच, एअर इंडिया ही चांगली एअरलाइन आहे. मला एअर इंडिया आवडते. मात्र, जास्तकाळ करदात्यांना पैशांबाबत आश्वासन देऊ शकत नाही, असेही अशोक गजपती राजू यावेळी म्हणाले.
एअर इंडियाची आर्थिक परिस्थिती बिकट असून कोणीही विकत घेणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2016 9:01 PM