शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
5
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
6
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
7
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
8
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
9
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
10
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
11
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
12
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
13
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
14
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
15
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
16
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
17
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
18
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
19
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
20
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण

हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 4:09 PM

Air Marshal Amar Preet Singh : एअर मार्शल अमरप्रीत सिंग ३० सप्टेंबर रोजी हवाई दल प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.

Air Marshal Amar Preet Singh appointed as next IAF chief : नवी दिल्ली : एअर मार्शल अमरप्रीत सिंग आता भारतीय हवाई दलाची कमान सांभाळणार आहेत. सरकारने अमरप्रीत सिंग यांची भारतीय हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. हवाई दल प्रमुख व्हीआर चौधरी यांच्यानंतर आता अमरप्रीत सिंग हे पदभार स्वीकारतील. सध्या अमरप्रीत सिंग हे हवाई दलाच्या उपप्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. 

एअर मार्शल अमरप्रीत सिंग ३० सप्टेंबर रोजी हवाई दल प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. सध्याचे हवाई दल प्रमुख व्हीआर चौधरी हे ३० सप्टेंबरला पदावरून निवृत्त होणार आहेत. अमरप्रीत सिंग यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९६४ रोजी झाला. १ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांची हवाई दलाचे ४७ वे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. 

एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांनी १९८४ मध्ये हवाई दलात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी इस्टर्न एअर कमांडमध्ये वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी म्हणून काम केले, त्यानंतर त्यांनी सेंट्रल एअर कमांडचेही नेतृत्व केले. अमरप्रीत सिंग यांनी आपल्या सेवेत चांगली कामगिरी केली आहे. अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्याएअर मार्शल अमरप्रीत सिंग यांनी आपल्या कारकिर्दीत फ्लाइट कमांडर, मिग-२७ स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर तसेच एअर बेसचे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ते राष्ट्रीय उड्डाण चाचणी केंद्रात प्रकल्प संचालक (उड्डाण चाचणी) देखील होते आणि त्यांच्याकडे तेजस या हलक्या लढाऊ विमानाच्या उड्डाण चाचणीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दरम्यान, एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांनी नॅशनल डिफेन्स अकादमी, वेलिंग्टनमधील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे.

कोणत्या पदकांनी सन्मानित करण्यात आले?एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक पदके मिळाली. त्यांना २०१९ मध्ये अति विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले, त्यानंतर २०२३ मध्ये त्यांना परम विशिष्ट सेवा पदक देखील देण्यात आले.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल