शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

वायुप्रदूषणाने मुंबईत १०,५०० अकाली मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 6:39 AM

वाहने व इमारत बांधकाम, यामुळे ‘पीएम २.५’ धूलिकण हवेत पसरून २०१६ मध्ये बृहन्मुंबईत १०,५०० नागरिकांचे अकाली मृत्यू झाले, असा निष्कर्ष ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट’ने केलेल्या ताज्या अभ्यासातून काढण्यात आला आहे.

नवी दिल्ली: वाहने व इमारत बांधकाम, यामुळे ‘पीएम २.५’ धूलिकण हवेत पसरून २०१६ मध्ये बृहन्मुंबईत १०,५०० नागरिकांचे अकाली मृत्यू झाले, असा निष्कर्ष ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट’ने केलेल्या ताज्या अभ्यासातून काढण्यात आला आहे.या अभ्यास पाहणीनुसार, अहवाल वर्षांत ‘पीएम २.५’ कणांमुळे भारतातील सर्वाधिक १४,८०० मृत्यू राजधानी दिल्लीमध्ये झाले. मृत्यूच्या प्रमाणात त्या खालोखाल मुंबई, कोलकाता (७,३०० ) व चेन्नई (४,८००) या महानगरांचा क्रमांक लागतो. सेंटरच्या संचालिक अनुमिता रॉय-चौधरी यांनी सांगितले की, अशा प्रकारे वायुप्रदूषणाने जगातील सर्वच महानगरांमध्ये कमी-अधिक प्रमाणात अकाली मृत्यू होत असतात, पण आशिया खंडातील महानगरांमध्ये त्यांचे प्रमाणजास्त आढळते. त्यामुळे चीन, भारत, पाकिस्तान व बांगलादेश या आशियाई देशांमधील महानगरे निवडून विशेष अभ्यास केला गेला. या चार देशांच्या विचार केला, तर चीनमधील बीजिंग (१८,२००) व शांघाय (१७,६००) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली अशी क्रमवारी लागते. हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर आणि निरंतर उपाय योजणे, प्रदूषणाची वेळच्या वेळी मोजणी करून, तत्काळ पावले उचलणे आणि किमान प्रदूषणाची कडक उद्दिष्टे ठरवून त्यांचे पालन करणे याखेरीज पर्याय नाही, असे रॉय-चौधरी म्हणाल्या.चीनमधील शहरांमध्ये हवेचा दर्जा खूप खराब असला तरी तेथील सरकार त्यास आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. त्या मानाने भारतासह इतर देशांत ढिलाई दिसते, असे त्या म्हणाल्या.>श्वसन आणि फुप्फुसांचे आजारमानवी व्यवहार आणि वारा-वादळासारख्या नैसर्गिक घटनांनी हवेमध्ये धूलिकण नेहमीच मिसळतात व पसरतात. यापैकी२.५ मिमीहून कमी आकाराचे धूलिकण आरोग्यास अधिक घातक ठरतात. माणसाच्या नाकात असलेल्या केसांमुळे श्वास घेताना हवेतील असे धूलिकणांना अटकाव होतो, पण २.५ मिमीहून लहान कण श्वसनाद्वारे सहजपणे शरीरात जातात. कालांतराने श्वासनलिका, फुप्फुसे यांवर अशा कणांचे आवरण तयार होऊन त्यांचे कार्य मंदावते. यातून पुढे श्वसनसंस्थेच्या व हृदयाच्या आजारांखेरीज प्रसंगी कर्करोगही होऊन अकाली मृत्यू ओढावतो.

टॅग्स :pollutionप्रदूषण