नवी दिल्ली : देशाने हवेचे प्रदूषण उत्तम व्यवस्थापनातून हाताळण्याची गरज आहे, असे राज्यसभेचे सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले.
सेंटर फॉर एअर पोल्यूशन स्टडीजने २६ व २७ ऑगस्ट रोजी सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड पॉलिसीत व्हर्च्युअली आयोजित केलेल्या ‘इंडिया क्लीन एअर समीट २०२१’मध्ये सहभागी झालेल्यांना मार्गदर्शन करताना प्रभू म्हणाले, ‘हवेच्या प्रदूषणाचा प्रश्न उत्तम व्यवस्थापनातून हाताळला जाऊ शकतो. आम्ही ऊर्जा वापरण्याचा आणि वाहतुकीचा मार्ग बदलला पाहिजे आणि औद्योगिक प्रदूषण कमी केले पाहिजे. आम्ही सुनियोजित प्रयत्न केले, तर स्वच्छ हवा मिळवू शकतो.” अमेरिकेतील हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्यूट या संघटनेचे अध्यक्ष डॅनिएल एस. ग्रीनबाऊन म्हणाले की, प्रदूषणाची पातळी नियंत्रित करण्यासाठी उत्सर्जनावर नियंत्रण आणावे.
प्रश्न वेगळ्या मार्गांनी सोडविण्याची गरज
आयोजक प्रतिमा सिंह म्हणाल्या की, “हवेच्या प्रदूषणाचा प्रश्न वेगळ्या मार्गांनी सोडविण्याची गरज आहे. हवेचे प्रदूषण रोखणारे धोरण अधिक कठोर बनविण्यासाठी हवामान बदलाचा सह लाभ होणारे यात समाविष्ट केले पाहिजेत.”