नवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटनेनं ग्लोबल एक्यूआय इंडेक्सच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केले आहेत. जागतिक संस्थेने आता सार्वजनिक आरोग्य लक्षात घेऊन मानके अधिक कडक केली आहेत. मानवी आरोग्यावर वायू प्रदूषणाचा वाईट परिणाम लक्षात घेता निकष कडक करण्यात आले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस म्हणाले, जगातील सर्व देशांमध्ये वायू प्रदूषण हा आरोग्यासाठी मोठा धोका आहे. पण त्याचा सर्वात जास्त परिणाम गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांवर होतो. नवीन मार्गदर्शक तत्त्वे वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे ठरवण्यात आली आहेत. मी सर्व देशांना त्यांचे पालन करण्याचे आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्याचे आवाहन करतो.
नवीन मार्गदर्शक तत्वेनवीन गाइडलाइंसनुसार, वार्षिक PM2.5 ची सरासरी 5 ug/m3 असायला हवी. यापूर्वी 2005 मध्ये हा आकडा 10 ug/m3 होता. तर, PM10 ची वार्षिक सरासरी 15 ug/m3 कर केले आहे. हा आकडा आधी 20 ug/m3 होता.
भारतात शेवटचा बदल 2009 मध्ये झाला
भारतातील राष्ट्रीय हवेच्या गुणवत्तेचे मानक शेवटचे 2009 मध्ये बदलले गेले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांपेक्षा भारतात निश्चित केलेले मानके खूपच शिथील आहेत. हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात तज्ज्ञाने म्हटले आहे की, भारताने आपल्या हवेच्या गुणवत्तेचे मानक बदलले पाहिजेत. नवीन मानकांशी तुलना केल्यास 2020 मध्ये जगातील 100 मोठ्या शहरांपैकी 92 शहरांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक WHO च्या नवीन मानकांपेक्षा जास्त आहे. यामध्ये पाच भारतीय शहरांचाही समावेश आहे.