शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

उन्हाळ्यात हवाई प्रवास भाड्यात ९ टक्के घसरण; मागणी वाढूनही स्वस्ताई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:58 AM

विमान प्रवासाचा विचार मनात असेल, तर पटकन निर्णय घ्या. यंदा उन्हाळ्यात देशांतर्गत विमान प्रवास ४ ते ९ टक्क्यांनी स्वस्त झाला आहे. ट्रॅव्हल अ‍ॅग्रीगेटर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई तिकिटांच्या मागणीत २0 टक्के वाढ झाली असतानाही भाड्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरण झाली आहे.

चेन्नई : विमान प्रवासाचा विचार मनात असेल, तर पटकन निर्णय घ्या. यंदा उन्हाळ्यात देशांतर्गत विमान प्रवास ४ ते ९ टक्क्यांनी स्वस्त झाला आहे. ट्रॅव्हल अ‍ॅग्रीगेटर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई तिकिटांच्या मागणीत २0 टक्के वाढ झाली असतानाही भाड्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरण झाली आहे.हवाई प्रवास भाड्यात गेल्या वर्षीच्या या काळाच्या तुलनेत ५ टक्के घसरण झाली आहे. केवळ दिल्ली-मुंबई क्षेत्रातील हवाई प्रवास भाडे १२ टक्क्यांनी वाढले आहे. एप्रिल ते जून या काळात हवाई प्रवास भाडे ९ टक्क्यांनी कमी झाले आहे. आंतरराष्टÑीय हवाई प्रवास भाड्यातही सरासरी १९ टक्के घसरण झाली आहे.यात्रा डॉट कॉमचे सीओओ शरद धल्ल यांनी सांगितले की, विमान कंपन्यांची अतिरिक्त क्षमता आणि कमालीची स्पर्धा यामुळे हवाई भाड्याचे दर घसरले आहेत. याशिवाय सध्या तेलाच्या किमतीही स्थिर असल्यामुळे विमान कंपन्यांच्या खर्चात बचत झाली आहे.धल्ल यांनी सांगितले की, मुंबई व दिल्ली या हवाई वाहतुकीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. विमानतळांवरील धावपट्ट्या बंद असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक महागली आहे.स्पर्धेमुळे सवलतीस्पर्धेमुळे विमान कंपन्यांनी सवलतीच्या अनेक योजना जाहीर केल्या आहेत. स्पाइस जेट, गोएअर आणि एअरएशिया या कंपन्यांनी १,६00 रुपयांच्या आत विमान प्रवासाच्या योजना आणल्या आहेत. नागपूर, चेन्नई, गुवाहाटी, इम्फाळ, पुणे, भुवनेश्वर ही गंतव्य स्थाने यंदाच्या हंगामात लोकप्रिय आहेत.

टॅग्स :Airportविमानतळ