ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - मुंबईहून 168 प्रवाशांना घेऊन जाणारे जेट एअरवेजचे विमान अपघातापासून थोडक्यात बचावले.
मुंबईहून निघालेल्या बी737 या विमानाचा ढाका विमानतळावर लॅन्डिग करताना अपघात झाला. हा अपघात 22 जानेवारीला घडला. यावेळी विमानात जवळपास 168 प्रवाशी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, या विमानाचे लॅन्डिग करताना धावपट्टीवर धडकले. यात विमानाच्या मागील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या विमानातून प्रवास करणा-या 168 प्रवाशांना कोणतीही इजा झाली नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, या विमानाला विमानतळाच्या धावपट्टीवरुन हटविण्यात आले असून या घटनेची चौकशी करण्यासाठी बोईंग कंपनीची एक टीम ढाक्याला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, याप्रकरणाची माहिती डिजीसीएला देण्यात आली आहे. ही घटना ढाका विमातळावर झाली असल्याने येथील प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती डीजीसीएच्या सुत्रांनी दिली आहे.
Jet Airways puts de roaster pilots of its B737-800 plane,with 168 people onboard, whose tail hit the runway while landing in Dhaka on Jan 22— ANI (@ANI_news) 24 January 2017