शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

ग्वाल्हेरमधील विमानतळाचे झाले युद्ध थिएटरमध्ये रूपांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 4:08 AM

कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय हवाई दलाने सोमवारी ग्वाल्हेर विमानतळाला युद्ध थिएटरमध्ये रूपांतरित केले.

ग्वाल्हेर : कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय हवाई दलाने सोमवारी ग्वाल्हेर विमानतळाला युद्ध थिएटरमध्ये रूपांतरित केले. १९९९ मध्ये झालेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांचे नाट्य रूपांतर यात सादर करण्यात आले आहे.जम्मू-काश्मीरच्या द्रास-कारगिल भागातील टायगर हिल हल्ल्याचे प्रतीकात्मक रूपांतरण करण्यात आले आहे. युद्धातील महत्त्वपूर्ण घटना पुन्हा उभ्या करण्यासाठी हवाई दलाने मिराज २००० विमान आणि स्फोटकांचा वापर केला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी एअर चीफ मार्शल बीएस धनोआ होते.भारतीय हवाई दलाने युद्धाची २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या उपक्रमाचे आयोजन केले आहे. विमानतळावरील प्रदर्शनात पाच मिराज २०००, दोन मिग २१ आणि एक सुखोई ३० एमकेआय तैनात करण्यात आले आहे. २००० मिराजपैकी एकात बॉम्बवाहक दाखविण्यात आले आहे. या बॉम्बचा उपयोग फेब्रुवारीत बालाकोटमध्ये हवाई हल्ल्यात करण्यात आला होता.हवाई दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कारगिल युद्ध म्हणजे उंच पहाडी भागात हवाई दलाच्या शक्तीचा एक अनुभव होता. आॅपरेशन विजयमध्ये सहभागी असलेले वीरता पुरस्कार प्राप्त करणारे सेवेत असलेले आणि सेवानिवृत्त अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. (वृत्तसंस्था)एएन-३२ विमानांचा वापर तूर्त अपरिहार्यग्वाल्हेर : जुन्या झालेल्या व वारंवार अपघात होणाºया अवजड मालवाहू एएन-३२ विमानांना पर्याय म्हणून नवी विमाने घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जोपर्यंत नवी विमाने येत नाहीत तोपर्यंत एएन-३२ विमानांचा वापर सुरू ठेवण्याखेरीज आमच्यापुढे अन्य पर्याय नाही, असे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. ए. धनोआ यांनी सोमवारी येथे सांगितले. कारगिल युद्धाच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त येथील हवाई तळावर आयोजित कार्यक्रमात धनोआ बोलत होते. ते म्हणाले की, उंच पहाडी प्रदेशात लष्करी साहित्य पोहोचविण्यासाठी हवाई दलाला सध्या तरी एएन-३२ विमानेच वापरणे भाग आहे. पर्याय म्हणून घेण्यात येत असलेली विमाने दाखल झाली की ती या कामासाठी वापरून एएन-३२ प्रशिक्षणासाठी वापरली जातील. हवाई दलातील मिराज लढाऊ विमानांचा ग्वाल्हेर हा मुख्य तळ आहे. याच मिराज विमानांनी ‘टायगर हिल’वर अचूक मारा केल्याने कारगिल युद्धास निर्णायक कलाटणी मिळाली, याचे हवाई दलाच्या प्रमुखांनी गौरवाने स्मरण दिले. बालाकोट ‘एअर स्ट्राईक’साठीही मिराज विमानेच वापरली गेली होती आणि मिराज विमाने हाच आजही हवाई दलाचा मुख्य मारक ताफा आहे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलIndiaभारत